आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणुकीत कागदपत्रांच्या पूर्ततेत हयगय नको!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुरागला बचत आणि गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, परंतु त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची कटकट त्याला नकोय. त्याला मुलासाठी बँकेत खाते सुरू करावे वाटते, परंतु बँकही काही कागदपत्रांची मागणी करते. एखादी पॉलिसी घ्यायची असेल तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. लांबलचक फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रेही मागितली जातात. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची झाली तर काही कागदपत्रे लागतात, यामुळे तो अस्वस्थ होतो. कागदपत्रांच्या मागणीला वैतागणारा अनुराग हा एकटाच नाही, कागदपत्रांची जमवाजमव करणे म्हणजे डोकेदुखी मानणारे अनेक जण आहेत.


असे असले तरी कागदपत्रांची पूर्तता करणे ही आवश्यक बाब असते. काही फसवेगिरी करणारे लोक बनावट खाते उघडून पैसे घेऊन पळाल्याची उदाहरणे घडली आहेत. काही लोक इन्शुरन्स पॉलिसी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चेक देतात. काही लोक आपली संपत्ती हडप करण्यासाठी दुसºयांना फसवतात. अशा प्रसंगांमध्ये कागदपत्रांमुळे आपण फसवलो जाण्यापासून वाचू शकतो. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी तीन प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात. यात पहिले आहे पॅनकार्ड. अनेकांकडे हे असते. नसल्यास त्यासाठी अर्ज करा. दुसरे आपले ओळखपत्र, जे सरकारी एजन्सीकडून देण्यात येते. यात आपले छायाचित्र आणि नाव असते. याने आपली ओळख सिद्ध होते. तिसरा पुरावा आपल्या निवासस्थानाचा. ज्या कागदपत्रात आपले पूर्ण नाव आणि पत्ता असेल त्याचा यात समावेश करता येतो. आपल्याला या तिन्हीची आणि काही सेल्फ अ‍ॅटेस्टेड फोटोकॉपीची गरज असते. याने आर्थिक व्यवहार करता येतो. तुम्ही स्मार्ट असाल तर या तिन्हींऐवजी एका पॅनकार्डनेच तिन्ही कागदपत्रांचे काम होणे शक्य आहे.

आपल्याला तीन पासपोर्ट साइज फोटो द्यायचे असतात. आजकाल तत्काळ फोटो काढून मिळतात. काही कॉपी तयार ठेवा, पाहिजे तेव्हा उपयोगी पडतील. तुमचे आर्थिक सल्लागार आणि एजंट या बाबी घेतील, फॉर्म भरतील. फॉर्ममध्ये आपले नाव - पत्ता बरोबर लिहिला की नाही हे पाहणे चांगले. मोबाइल नंबरही द्या, त्यामुळे तत्काळ माहिती मिळत राहील. बँक किंवा म्युच्युअल फंड्ससाठी वैयक्तिक पडताळणी आवश्यक असते. यासाठी रिलेशनशिप मॅनेजर घरी येऊन पत्त्याची पडताळणी करतात. अनुरागला कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा बनवावी लागेल. असे झाले तर त्याला काही अडचण येणार नाही आणि व्यवहार होत राहील. एकदा खाते उघडले की नंतर काही औपचारिकता करण्याचीही गरज नाही.