आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिझनेस आणि कंपन्यांमध्ये काम करणा-या लोकांचे आकलन इथिक व व्हॅल्यू सिस्टिमच्या आधारावर होत आहे. इथिकल डिसीजन (नैतिक निर्णय) घेताना हे छोटे टप्पे लक्षात ठेवा :
* इथिकल इश्यूज ओळखा.
* निर्णयावर अवलंबून असणा-या तथ्यांची यादी करा.
* तुमच्या निर्णयाचा किती लोकांवर परिणाम होणार आहे आणि तो काय होणार? याची यादी तयार करा.
*ज्या लोकांवर परिणाम होणार आहे, त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हेही लक्षात घ्या.
* तीन पर्यायी कृती योजना तयार करा आणि प्रत्येक योजनेसाठी चांगले व वाईट उदाहरण तयार करा.
* कृती योजनेचा अंमलबजावणी आराखडाही तयार करून ठेवा.
या सहा टप्प्यांच्या आधारावरच नॅशनल इन्फोटेक नेटवर्क कंपनी आपल्या कर्मचा-यांबाबतचे नैतिक निर्णय घेते. ते पुढील प्रमाणे समजून घेऊ या...
केस -1। लीला एचआर विभागात सहायक व्यवस्थापक आहे. त्यांचा मित्र मोहित त्यांच्याच कंपनीत नोकरीसाठी अर्ज करत आहे. लीला रेफरन्स व्हायला तयार आहे. मोहित लीलाला मुलाखतीची तयारी करायला सांगत आहे. लीलाकडे मुलाखतीतील प्रश्नांची यादी आहे. त्याची एक प्रत मोहितला द्यावी, असा तिचा विचार आहे.
केस-2। नितीन गुणवत्ता नियंत्रणात आहे. त्याचे पर्यवेक्षक एका प्राथमिक शाळेला वर्षातून एकदा संगणक देतात. या देवाण-घेवाणीची कार्यालयीन नोंद नाही. नितीनला मुलासाठी कॉलेजमध्ये संगणक पाहिजे. पर्यवेक्षक त्यांना 12 संगणक न्यायला सांगतो.
केस- 3। मानव फॅसिलिटी मॅनेजमेंट विभागात सचिव आहे. त्यांना नवीन संगणक मिळालेला आहे. ते त्याच्यावर खासजी काम करू इच्छितात. त्यांचे पर्यवेक्षक मात्र या संगणकाचा वापर कार्यालयीन कामासाठीच करू इच्छितात. मानवला ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या माहितीपेक्षाही ई-मेल सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहे. मित्राला ई-मेल पाठवणे आणि प्रतीक्षा करणे हा एक मार्ग आहे. त्याचा पर्यवेक्षक घरी गेलेला आहे आणि त्याच्याकडे केवळ तीस मिनिटे वेळ शिल्लक राहिलेला आहे.
कार्यकारी उपाध्यक्ष, डीएचआर इंटरनॅशनल, मुंबई
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.