आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डार्क होठांवर लावा या रंगाच्या लिपस्टिक, दिसाल आणखी सुंदर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बाजारात असंख्या रंगाच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक रंगाची लिपस्टिक प्रत्येक महिलेच्या होठांवर मॅच होणार नाही. त्यात जर तुमच्या होठांचा रंग डार्क असेल तर नेमकी कुठल्या रंगाची लिपस्टिक मॅच होईल हा प्रश्न ब-याच महिलांना पडतो. तुमचे होठ देखील डार्क रंगाचे असतील आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर खाली देण्यात आलेल्या रंगाच्या लिपस्टिक बाजारातून विकत आणा आणि लूकमध्ये आणखी रंग भरा....
1. प्‍लम - प्‍लम कलरची लिपस्टिक लावल्याने तुमचे होठ भरलेले दिसण्यास मदत होईल.
2. चेरी कलर - चेरी कलर देखील प्‍लम कलर सारखाच दिसतो. या रंगाची लिपस्टिक लावण्याने तुमचा लूक थोडासा बोल्‍ड दिसेल.
3. ब्राउन - या रंगाची लिपस्टिक डार्क होठांसाठी उत्तम आहे. ही लिपस्टिक तुमच्या स्‍किन टोनला मॅच करणारी असल्याने तुमचा गेटअप आणखीन उठून दिसण्यास मदत होईल.
4. कोकोआ - या रंगाची लिपस्टिक जास्त बोल्‍ड दिसत नाही आणि जास्त लाइटही वाटत नाही.
5. कोरल - या रंगाची लिपस्टिक लावताना थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. हा रंग थोडासा भडक असल्याने तुमचा गेटअप भडक वाटू शकतो.
6. मॉफ - भडक रंगाच्या त्वचा असणा-या महिलांसाठी हा रंग उत्तम पर्याय आहे.
7. शिमर पिंक - या रंगाच्या लिपस्‍टिकचा शेड दिसायला सुंदर दिसतो. यामुळे तुमचे होठ आकर्षित दिसण्यास मदत होईल.
8. न्‍यूड - तुम्हाला जर जास्त मेकअप करायचा नसेल तर तुम्ही या रंगाच्या लिपस्टिकचा पर्याय निवडू शकता.