Home »Divya Marathi Special» Best Websites For Come Down Stress

AMAZING WEBSITE: तणावमुक्‍तीसाठी योग्‍य पर्याय www.calm.com

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 19:15 PM IST

  • AMAZING WEBSITE: तणावमुक्‍तीसाठी योग्‍य पर्याय www.calm.com

एखाद्या तणावपूर्ण कामानंतर रम्य निसर्गमय ठिकाणी जाण्याची इच्छा होते पण कामाच्या व्यापात शक्य होईल यांची शाश्वती नसते. यावेळी ही वेबसाइट फार उपयुक्त ठरते. शहरातील गोंगाटातही बसल्या जागी नयनरम्य परिसराचा आस्वाद घेता येईल. वेबसाइटवर सहा वेगवेगळ्या प्रकारचे सीन (दृश्य) उपलब्ध आहेत. यापैकी एक निवड करून मंद संगीत ऐकत निसर्ग पाहण्याचा आनंद उपभोगता येईल.

यातील दृश्यात जंगलातील नदीपासून समुद्र किनार्‍यावरील सूर्यास्तापर्यंत अनेक चांगल्या दृश्यांचा समावेश आहे. तुम्ही आपल्या सोयीनुसार संगणकावर दोन ते 10 मिनिटांपर्यंत टाइमसेट करून निवांतपणाचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही मंद संगीताचा पर्यायही निवडू शकता. त्याचप्रमाणे यातील दृश्याची माहिती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. निसर्गरम्य ठिकाणी नाही जमले तरी व्हर्च्‍युअल जगात जाऊन तुम्ही निवांतपणाचा अनुभव घेऊ शकता.

Next Article

Recommended