आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा रोमांच, आव्हाने घेऊन पुन्हा आला ‘ब्रेन हंट 2’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- दैनिक भास्कर समूहाचा ‘भास्कर चॅम्प्स क्लब’ देशातील होतकरू व प्रतिभासंपन्न मुलांसाठी नव्याने ‘ब्रेन हंट 2’ (चॅलेंज अँड इमॅजिनेशन) स्पर्धा घेऊन आला आहे. या राष्ट्रीय स्पध्रेत लाखो मुले आपली प्रतिभा तसेच जिद्द जगासमोर सादर करतील. गेल्या वर्षी या स्पध्रेत 3 लाख 874 मुलांनी तसेच 4500 शाळांनी एकत्रित सहभागी होऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले होते. ‘ब्रेन हंट 2’मध्ये पहिलीपासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील.

आधीच्या सत्रापेक्षा आगळ्या असलेल्या यंदाच्या ब्रेन हंट-2 मध्ये अनेक रंजक व ज्ञानवर्धक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. आपली कल्पनाशक्ती व कलात्मक अभिव्यक्ती सर्वांसमोर आणण्याची जिद्द असलेल्या मुलांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. एखाद्या कारणामुळे गतवर्षीच्या ब्रेन हंटमध्ये सहभागी होण्यापासून मुकलेल्या मुलांना यंदाच्या ब्रेन हंट-2 मध्ये आपले गुण दाखवून देण्याची संधी आहे. ब्रेन हंट-2 (चॅलेंज युअर इमॉजिनेशन) ही भास्कर चॅम्पस् क्लबची 6 वी स्पर्धा आहे. यात मुलांना अँक्टिव्हिटी किटच्या रुपात एक पुस्तिका दिली जाईल. यातील दिशा-निर्देशांच्या आधारे ते स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतील. मुलांना ब्रेन हंट-2 अँक्टिव्हिटी बुकलेट हे हिंदी, इंग्रजी, गुजराती वा मराठी यापैकी कोणत्याही एका भाषेत बनवता येईल. यातील देशविदेशातील मुलांना सहभाग घेता येईल. ही स्पर्धा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, झारखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश व दिल्लीत आयोजित केली जात आहे. निरंतर नवनव्या विचारांतूनच नवकल्पना उगम पावतात, असा दृढविश्वास दैनिक भास्कर समूहाला आहे. भास्कर चॅम्पस् क्लबच्या या उपक्रमांच्या माध्यमातून उगवत्या पिढीत प्रतिभाशाली व दूरदर्शी विचारांची रुजवण व्हावी, असा दैनिक भास्कर समूहाचा प्रयत्न आहे. समूहाचे उपाध्यक्ष (सेल्स अँड मार्केट डेव्हलपमेंट) विनय माहेश्वरी म्हणतात, या स्पर्धांमुळे मुलांत नवा उत्साह संचारून त्यांना अभ्यास व परीक्षेच्या काळातील ताणतणावांपासून दूर ठेवण्यात मदत होईल. तसेच भविष्यात्सृजनशील काम करण्यासाठी प्रेरणाही देईल. ब्रेन हंट-2 मध्ये भाग घेण्यासाठी मुले आपल्या शाळेतील समन्वयक यांच्याशी संपर्क करून अथवा आपल्या जवळच्या दैनिक भास्कर/दैनिक दिव्य मराठी कार्यालयात नावनोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी 07553913323 या फोन क्रमांकावर कॉल करा किंवा खालील फेसबुकवर पेजला भेट द्या www.facebook.com/bhaskarchampsclub