आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Leaders; Equipped Team : This Is Modi And Rahul Team

मोठे नेते ; सज्ज टीम : ही आहे मोदी आणि राहुलची खासगी टीम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानपदाचे दावेदार भाजपकडून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी या दोघांच्याही स्वतंत्र टीम आहेत. तंत्रज्ञानामध्ये निपुणता असण्याबरोबरच या दोन्ही नेत्यांना वेळोवेळी सल्ले देण्याचे महत्त्वाचे कामही या टीममधील सदस्य करत असतात. कदाचित म्हणूनच या दोन्ही टीम या नेत्यांच्या ‘कॉन्शिअर कीपर’प्रमाणे काम करतात.

० कुनियील कैलासनाथन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव
* वय - 59 वर्षे
* शिक्षण - मद्रास विद्यापीठातून एमपीएससी आणि ब्रिटनच्या वेल्स विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र)
गुजरातमध्ये त्यांना अत्यंत आदराने ओळखले जाते. कारण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ते अगदी नजीकचे आहेत. त्यांना ‘केके’ म्हटले जाते आणि ते मोदींचे संकटमोचक आहेत. 30 वर्षे आयएएसद्वारे त्यांनी देशसेवा केली. त्यानंतर 31 मे रोजी जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांनी काही काळ विश्रांती घ्यायचे ठरवले. पण मोदींनी ऐकले नाही. ते मोदींचे इतके प्रिय होते की, त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मोदी केरळलाही गेले होते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गुंतवणुकीचे श्रेयही त्यांना जाते. प्रसिद्धीपासून ते दूर असतात, पण 1999 ते 2002 दरम्यान अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त असताना त्यांची पत्रकारांबरोबरही गट्टी जमायची.


० मौलिक भगत, मुख्यमंत्र्यांचे थ्रीडी अभियान सांभाळणार
* वय - 28 वर्षे
या वेळी प्रचारादरम्यान मोदींच्या भाषणात थ्रीडी अनुभव उपस्थित प्रेक्षकांना घेता येणार आहे. मौलिक हेच हा चमत्कार घडवणार आहेत. ते संघाचे प्रचारक आणि मोदींचे घनिष्ठ परनेंदू भगत (काकूभाई) यांचे पुत्र आहेत. सीए ‘काकूभाई’ मोदींच्या अगदी जवळचे मित्र आहेत.
सॉफ्टवेअर आणि मीडिया फर्म असणा-या मौलिक यांचा विवाह राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या पुतणीबरोबर झालेला आहे. मोदींच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीला 3 मिनिटे 58 सेकंदांच्या गाण्यात बसवण्याची जबाबदारीही मौलिकवरच होती. ते मात्र याला नकार देतात. ‘वनथम्ब्यू गुजरात...’ असे बोल असणारे हे गाणे मोदींच्या वेबसाइटवर
आहे. मोदी टीमचे सर्वात तरुण सदस्य आहेत.


०डॉ. हिरेन जोशी,
मोदींचे ओएसडी (आयटी)
३ शिक्षण - आयआयआयटी उत्तीर्ण विवेकानंदांवर अपार श्रद्धा असणा-या डॉ. जोशी यांचा असा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीकडे ज्ञानाचे भांडार हे असतेच. त्यांच्या पत्नी आहेत गौरी जोशी. त्या धीरुभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील गुणवंत विद्यार्थिनी आहेत. जोशी इतके साधे आहेत की, ते कधीही आपल्या नावाचा वापर करत नाहीत. 2009 मध्ये एअर इंडियाच्या विमानात त्यांच्या पत्नीची बॅग हरवली होती. त्यात त्यांचे सर्व शोधनिबंध होते. मुख्यमंत्र्यांच्या या ओएसडीने (विशेष अधिकारी) ठरवले असते तर आकाश-पाताळ एक केले असते. पण त्यांनी अगदी शांत दिली. लो पॉवर डिझाइनमध्ये पीएचडी करणा-या या एकट्या व्यक्तीवर मोदींच्या आयटीच्या संपूर्ण कामाचा भार आहे. तंत्रज्ञानाच्या इतके जवळ असूनही त्यांच्याबाबत इंटरनेटवर असणारे फोटो व माहिती अत्यल्प आहे.


मोदींच्या टीमचे इतर सदस्य - परनेंदू भगत, राजिका कचीरिया, पराग शहा