आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्लिंटन यांच्या भाषणाची फी ३ कोटी ३० लाख रुपये, पदाचा गैरवापर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या एका माजी अध्यक्षाने आपल्या सेवाभावी संस्थेमध्ये एड्स संक्रमण, हवामान बदल व गरिबी यावर चर्चासत्र ठेवले होते. या चर्चासत्राचे आयोजक असलेल्या एका स्थानिक बँकेच्या अध्यक्षाने बिल क्लिंटन यांना विचारले की, “तुमच्या पत्नी हिलरी पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढणार आहेत का? ‘ बिल क्लिंटन यांनी हा प्रश्न सफाईने टाळला. नंतर असे लक्षात आले की, हे भाषण त्यांनी सेवाभावी संस्थांना मदत मिळवण्यासाठी केले नसून वैयक्तिक फायद्यासाठी तब्बल ३ कोटी ३० लाख रुपये मोजून केले होते. बिल यांनी अशी शेकडो भाषणे जगभरात केली आहेत.

राजकारण, पदाचा लाभ व सेवाभाव (परोपकार) यांची सरमिसळ केल्याने क्लिंटन दांपत्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्थात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा व त्यांचे वर्तन यांच्या तुलनेत क्लिंटन यांच्यातल्या कमतरता व त्रुटी फिक्या पडतात. पण हिलरी यांना प्रत्येक प्रचार सभेत आपल्या आर्थिक व्यवहारांचे स्पष्टीकरण जनतेला वारंवार द्यावे लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी क्लिंटन दांपत्य आपल्या सेवाभावी संस्थेचा कारभार नियंत्रित राहील, असे आश्वासन देत आहेत. या दांपत्याची “क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह’ (सीजीआय) ही सेवाभावी संस्था कल्याणकारी काम करत आहे. क्लिंटन यांच्या कार्यक्षेत्राचा विचार करता अनेक सकारात्मक व नकारात्मक बाबी हाती येतात.

क्लिंटन यांच्या कार्यक्षेत्राचे प्रमुख आधार –
पहिले : राजकारणात राहून व सार्वजनिक जीवनात विविध पदे भूषवतानाही घेतलेल्या भूमिका.
दुसरे : स्वत:च्या संस्थेकरिता व स्वत:साठी कमावलेल्या पैशामध्ये त्यांनी केलेली फारकत. असे म्हणतात की, २००१ मध्ये बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर या दांपत्याने ७२८ व्याख्याने देऊन त्यातून १०२४ कोटी रुपये कमावले होते. या एकूण कमाईतील ८६ टक्के कमाई बिल क्लिंटन यांनी त्यांच्या व्याख्यानातून कमावली आहे. हिलरी यांनी परराष्ट्रमंत्री असताना एकही भाषण दिले नाही. पण २००९ ते २०१३ या कालावधीत परराष्ट्रमंत्री असताना बिल क्लिंटन यांना त्यांच्या भाषणातून ३२५ कोटी रुपये मिळाले होते. बिल यांची भाषणे मॉस्को, जेद्दाह, बीजिंग या शहरांमध्येही झाली. सुमारे ४३ टक्के रक्कम त्यांना परदेशी दौऱ्यातून मिळाली. २००८-१० या काळात अमेरिकेत आर्थिक संकट निर्माण झाले असताना बँकांवरचे सरकारी नियंत्रण व राजकीय नेते यांच्यातील हितसंबंध यावर जगभरात चिंता व्यक्त केली जात होती. अशा काळात क्लिंटन फाउंडेशनला मिळालेल्या देणग्या वादग्रस्त होत्या. क्लिंटन दांपत्याने या काळात टोरंटो डोमिनियनसाठी १३, गोल्डमन सॅक्स १२, यूबीएससाठी १० भाषणे िदली होती त्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिकेतल्या बँक िनयंत्रण मंडळाने ज्या २३ बँका महत्त्वाच्या ठरवल्या होत्या त्यातील १२ बँकांमध्ये क्लिंटन दांपत्याने भाषण दिले होते.

तिसरी बाब क्लिंटन दांपत्याचा सेवाभाव. बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना ग्रंथालयासाठी त्यांनी निधी उभा करण्यास सुरुवात केली होती. त्यातून या फाउंडेशनने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. बिल क्लिंटन म्हणतात, अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केले. पण ११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला झाल्यानंतर या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या मुलांना मदत करावी या उद्देशाने पैसे जमवण्यास सुरुवात झाली. २००२ मध्ये या फाउंडेशनने एचआयव्ही एड्स पीडितांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम आखली.

२००१ मध्ये या संस्थेला देणगी व अनुदानातून ६६ कोटी रु. मिळाले होते ती रक्कम २०१४ मध्ये २२४८ कोटी रु. इतकी झाली. मालमत्ता १३९ कोटी रु.हून २९२६ कोटी रु. झाली. क्लिंटन फाउंडेशन अन्य फाउंडेशनपेक्षा वेगळे काम करते. त्यांच्याकडे दोन हजार कर्मचारी आहेत. २०१४ मध्ये ६४ टक्के रक्कम विविध प्रकल्पांवर खर्च केली गेली. फाउंडेशनचा दोन तृतीयांश निधी एड्स पीडितांवर खर्च झाला आहे. हा विक्रम आहे. अँटिरेट्रोव्हायरल औषधांचे दर कमी करण्यामागे या संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. या फाउंडेशनचे व्यवस्थापन क्लिंटन परिवार व राजकारणाशी जोडलेल्या काही व्यक्तींच्या हातात आहे. हिलरी यांची कन्या चेल्सी या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत. संचालक, अध्यक्ष व काही वरिष्ठ अधिकारी सरकारबरोबर काम करत आहेत. या फाउंडेशनचे सुमारे नऊ टक्के आर्थिक स्रोत (१२०० कोटी रु) परदेशात आहे. त्यात सौदी अरेबिया, कुवेत या देशांमधून ३५९ कोटी रुपये आले आहेत.

एक महत्त्वाचा प्रश्न असा की, या फाउंडेशनला देणगी देणाऱ्यांनी त्यांचा काय फायदा करून घेतला? हिलरी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना काही देणगीदारांनी त्यांच्याकडून फायदा घेतला असण्याची शक्यता आहे. क्लिंटन दांपत्याने जे १०२४ कोटी रु. भाषणांमधून कमावले आहेत त्यामध्ये पदाचा गैरवापर हा मुद्दा आहे. बिल यांनी स्वत:च्या फायद्यासाठी भाषणे दिली आहेत. हिलरी या परराष्ट्रमंत्री असताना बिल यांनी आपली फी वाढवल्याचेही दिसून आले आहे (सोबतचा तक्ता पाहा). खूप गदारोळानंतर क्लिंटन दांपत्याला आपल्या कारभाराकडे पुन्हा वळून बघावे लागत आहे. बिल क्लिंटन आता म्हणतात, हिलरी अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ते स्वत: फाउंडेशनच्या कामातून वेगळे होतील व परदेशातून, खासगी संस्थांकडून पैसे घेणे थांबवतील.
बातम्या आणखी आहेत...