आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडपाठ आहे बिल गेट्सचा पहिला मेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> जन्म : 1969, हैदराबाद
> शिक्षण :- हैदराबाद पब्लिक स्कूल, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमधून संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
जेव्हा सत्या यांना मायक्रोसॉफ्टमध्ये सर्व्हर विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली त्या वेळी मणिपाल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनाही उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पडू लागली. याच विद्यापीठातून इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनियरिंग करणारे सत्या हे 1992 पासून बिल गेट्स यांच्याबरोबर काम करत आहेत. कामाच्या संदर्भात बिल गेट्स यांनी पाठवलेला पहिला ई-मेल त्यांना आजही तोंडपाठ आहे. त्यात एका उत्पादनामध्ये काही सुधारणा त्यांनी सुचवल्या होत्या. सोबत काम करताना त्यांना समजून घेण्याची संधीही मिळाली.
हैदराबादेत लहानपणी ते क्रिकेट खेळायचे. त्याचा फायदा मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना त्यांना झाला. काम करताना टीम स्पिरिट (संघभावना) कसे ठेवायचे हे त्यांना क्रिकेटमुळे समजले. शाळेत क्रिकेटचे कर्णधार असल्याने नेतृत्वगुणाचे धडे मिळाले. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘माझी ओव्हर संपली. अगदीच सरासरी ओव्हर होती. त्यानंतर कर्णधाराने बॉलिंग केली. त्यात टीमला यश मिळाले आणि मला इशा-यात हेही समजावण्यात आले की, बॉलिंग कशी करावी. ती ओव्हर संपताच पुन्हा चेंडू माझ्याकडे सोपवण्यात आला. तेव्हा माझ्या लक्षात आलेले होते की, मला काय करायचे आहे.’ त्यांना ग्रेट प्लेन्सचे संस्थापक डॉग बरगम, गेट्स फाउंडेशनचे सीईओ जेफ रॅक्स, बिल गेट्स आणि स्टीव्ह बामर या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. माझे मूळ अजूनही भारतातच आहे. दरवर्षी आई-वडिलांना भेटण्यासाठी भारतात येतोच.