आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक वाचनाने करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत झाली: बिल गेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स वर्षातून अनेकदा त्यांना आवडलेल्या पुस्तकांची यादी जाहीर करतात. टाइम मॅगझिनशी बोलताना त्यांनी लिखित शब्दांप्रती असलेली त्यांची आवड, त्यांना प्रभावीत करणाऱ्या पुस्तकांबद्दलच्या भावना प्रकट केल्या. त्याचा संक्षिप्त अंश...
 
तुम्ही नेहमी कोणते पुस्तक वाचण्याचा सल्ला देता? पुस्तकांच्या बाबतीत तुम्ही कोणाच्या शिफारशींवर अंमल करता?
- मी काही वर्षांपूर्वी स्टिव्हन पिंकर्स यांचे "द बेटर एंजेल्स ऑफ अवर नेचर' हे पुस्तक वाचले होते. यासंदर्भात त्यांच्याशी बोलणेही झाले. माझ्या ब्लॉगवर, गेट्स नोट्समध्ये या पुस्तकासंदर्भात लिहिले होते. इतरांनीही हे पुस्तक वाचावे, अशी माझी इच्छा होती. हे माझे आवडते पुस्तक असून इतरांनाही मी त्यासाठी आग्रह करतो. मी मेलिंडा (पत्नी)च्या शिफारशींवर विश्वास ठेवतो.
 
कोणत्या तीन पुस्तकांनी तुमच्या जीवनात बदल घडविला आहे.?
- पिंकर्स यांच्या "बेटर एंजेल्स'ने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला. मानवी समाजात हिंसा वेगाने कमी होत आहे आणि हिंसा सहन करण्याची क्षमताही घटत चालली आहे.  गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून मेलिंडा आणि मी जे काम करतोय त्याची प्रेरणा या पुस्तकामुळेच मिळाली. जग आणखी चांगलं होतय की पुस्तकाची संकल्पना आहे. वॉरन बफेट यांनी काही वर्षांपूर्वी मला जॉन ब्रुक्स यांचे "बिझनेस अॅडव्हेंचर्स' हे पुस्तक दिले होते. मी बिझनेसबाबतचे याच्याइतके दुसरे चांगले पुस्तक वाचलेले नाही. त्यात काही कंपन्यांचे यश आणि अपयश यावर आधारित असलेल्या निबंधांचा संग्रह आहे. "जीरोक्स जीरोक्स जीरोक्स जीरोक्स’ मथळ्याखालील निबंधाला पुस्कार मिळायला हवा. पुस्तकाने अनेक मौल्यवान सल्ले आहेत. एफ. स्कॉट फिट्जेराॅल्ड यांचे "द ग्रेट गेट्सबी' माझ्यासाठी अनेक दृष्टिकोनातून खास आहे.
 
आवडते पुस्तक कोणते आहे?
- आवडत्या पुस्तकाची निवड कठीण आहे कारण लहानपणी मी अनेक कथासंग्रह वाचले होते.  मी लहानपणी वर्ल्ड बुक एनसायक्लोपीडिया चा पूर्ण सेट वाचून काढला होता.
 
एखादे पुस्तक वाचण्याचे नाटक केले आहे का?
- मी असे कधीही केलेले नाही. मी एखादे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर ते अर्धवट सोडत नाही. जरी ते मला आवडले नाही तरीही. मला एखादे पुस्तक न आवडल्यास समासावर जास्तीत जास्त नोट्स काढतो.
 
बातम्या आणखी आहेत...