आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या तंत्रज्ञानाने हॅकर्सचे काम बनवले सोपे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत बँक, पोलिस, विधी संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई-मेल अकाउंट चोरणा-या हॅकर्सचे मजबूत नेटवर्क तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टार्गेट, नीमेन मार्कस आणि मायकेल कंपन्यांच्या स्टोअरवर दहा कोटींहून जास्त खाती हॅकर्सच्या निशाण्यावर होती. अलीकडेच पुन्हा हॅकर्सचे हल्ले सुरू झाले आहेत.
अनेक नव्या बाबतीत हॅकर्सनी रिटेल दुकानदारांच्या खात्यांत छुप्या पद्धतीने मेलवेअर लावून मोठ्या प्रमाणात क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्ड क्रमांक मिळवले. नंतर हॅकर्सनी हा डेटा गुन्हेगारांच्या दुस-या गटाला विकला. काही दिवसांनंतर डेटावरून बनलेले बनावट कार्ड ऑनलाइन खरेदीसाठी वापरले.
खरे तर, इतर देशांच्या तुलनेत अमेरिकन कार्ड अधिक असुरक्षित आहेत. त्यात 40 वर्षांचे जुने मेगास्ट्राइप तंत्रज्ञान वापरले जात आहे. इतर देशांमध्ये ईएमव्ही (युरोप मास्टरकार्ड व्हिसा) तंत्र वापरले जाते. हे तंत्रज्ञान चिप व पिनद्वारे देवाण-घेवाण करते. खर्च अधिक असल्यामुळे बँक आणि व्यावसायिक कार्ड्समध्ये सुरक्षित तंत्रज्ञान अंगीकारण्यास बिचकत आहेत. बँकिंग व्यवसायाशी संबंधित डेव्हिड रॉबर्टसन यांचे म्हणणे आहे, चिप, पिनयुक्त कार्डचा खर्च तीन डॉलर आहे.
कार्ड जारी करणा-यांचा अंदाज आहे की, फसवणुकीच्या बाबतीत झालेल्या हानीच्या तुलनेत इएमव्ही तंत्रज्ञान स्वीकारणे अधिक महागात पडेल. मेगस्ट्राइप तंत्रज्ञानावर आधारित अमेरिकन रिटेलर आणि कन्झ्युमर जगतात बाजूला पडले आहेत.
अमेरिकेत डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्डवर अदा करण्यासंबंधी सुरक्षा अधिक असते. तुमचे क्रेडिट कार्ड कोणी चोरून वापरत असल्यास कार्ड जारी करणा-या किंवा बँकेला झळ सोसावी लागेल. यादरम्यान रिटेलर्स वा बँकांवर चिप, पिन तंत्र वापरण्यासाठी दबाव येत आहे. जेपी मोर्गन चेझचे सीईओ जेमी डिमोननी यासाठी पुढाकार घेतला आहे. टारगेट व नीमन कंपन्यांवर झालेल्या हॅकिंगने खर्चाचे गणित बदलले आहे.
दोन्ही कंपन्यांचे कार्ड रजिस्टर व टर्मिनल चिप, पिन तंत्रज्ञानाप्रमाणे बदलल्यावर 6.75 अब्ज डॉलर खर्च येऊ शकतो. परंतु, हॅकिंगची झळ बसलेल्या कन्झ्युमर्सला याची अधिक भरपाई द्यावी लागेल.
कार्ड पेमेंटचा व्यवहार करणा-या कंपन्या मास्टर कार्ड आणि व्हिसादेखील बदलण्याच्या प्रयत्नात लागली आहे. दोन्ही फर्म्सनी ट्रान्झॅक्शन चैनशी संबंधित सर्व बाजू व्यापारी, नेटवर्क, बँकांना इशारा दिला आहे की, ऑक्टोबर 2015 पर्यंत इएमव्ही तंत्राचा वापर सुरू न केल्यास फसवणुकीचा परिणाम त्यांना सोसावा लागेल. इकडे, अ‍ॅपवररून लेस स्मार्टफोन आणि डिजिटल वॅलेट्सनी कार्ड आणि कॅशच्या क्षेत्रात शह देण्याला सुरुवात केली आहे.
अब्जावधींची फसवणूक
अमेरिकेत पाच अब्ज मेगस्ट्राइप क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड चलनात आहेत. जगभरात गेल्या वर्षी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 775 अब्ज रुपयांची फसवणूक झाली आहे. अमेरिकेच्या वाट्याला सुमारे 343 अब्ज रुपयांची क्रेडिट कार्ड फसवणूक आली आहे.
अशी होते हॅकिंग
इलेक्ट्रॉनिक पेमेंट कंपनी क्रेडिट कॉलचे प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी जेरेमी गंबले सांगतात, प्रत्येक मेगस्ट्राइपमध्ये माहितीचे तीन ट्रॅक असतात. पहिल्या आणि तिस-या ट्रॅकचा वापर बँक किंवा कार्ड जारी करणारे करतात. आवश्यक माहिती दुस-या ट्रॅकमध्ये असते. मेलवेअरद्वारे हॅकर मेमरी स्कॅन करतो. टेक्स्ट फाइल बनवून घेतो. त्या तुलनेत चिप व पिन कार्डाची कॉपी अशक्य आहे. कारण, त्यात माहिती सांकेतिक भाषेत असते.