आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी चुकीचे निर्णय कसे काय घेतात? जोखमीच्या व्यापाराचा जीवशास्त्रीय आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या यशस्वी व्यावसायिकाचे झालेले प्रचंड नुकसान व त्या नुकसानीची त्याच्या बँकेला झळ बसल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा वाचतो. असे का घडते? बँकेचे व्यवस्थापक अशा ग्राहकाच्या वास्तविक परिस्थितीबाबत अनभिज्ञ होते का? नुकतेच करण्यात आलेले एक सर्वेक्षण याच बाबीवर प्रकाश टाकते. व्यावसायिकांकडून चुका का झाल्या असतील, याची कारणे मानवी शरीराच्या हालचालींमधून समजू शकतात.
आपण व्यावसायिक किंवा अन्य कोणतीही जोखीम पत्करतो तेव्हा फक्त त्याबाबत विचारच करत नसतो, तर शारीरिकदृष्ट्या कंबर कसून तयार असतो. शरीर व मेंदू एकत्रितपणे कार्य करत असतात. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग फ्लोअरवर शेअर्सच्या भावात चढ-उताराच्या बातम्या ऐकताना ट्रेडर्सची इंद्रिये हाय अलर्टच्या स्थितीत असतात. श्वासाचा वेग वाढलेला असतो, हृदयगती वाढलेली असते, मांसपेशींवरचा ताण वाढलेला असतो.
केंब्रिज विद्यापीठातील माझ्या सहका-यांसह मी लंडनच्या टेंडिंग फ्लोअरवर अनेक प्रयोग केले. यातून लक्षात आले की जिंकताना शारीरिक प्रतिक्रियांमध्ये वाढ होते. पुरुष स्पर्धेत उतरतात तेव्हा त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन उसळी मारते. हिमोग्लोबीनमध्ये वाढ झाल्याने मेंदूला प्राणवायूचा पुरवठा करण्याची रक्ताची क्षमता वाढते. जोखीम पत्करण्याची भूकही वाढते. विजेत्याच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणखी वाढते. शरीरातून सकारात्मक संकेत मिळतात. याला विनर इफेक्ट म्हणतात. स्पर्धेसाठी सज्ज असलेले अ‍ॅथलीट, जोखमीचा व्यवसाय करणारे व्यापारी व निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करणाºया राजकारण्यांच्या शरीरातही हे बदल होतातच. परीक्षा तसेच स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. धोके पत्करण्याचे चांगले परिणाम मिळाले की फाजील आत्मविश्वास बळावणे साहजिक आहे. अशात व्यापारी मोठी बोली लावण्याची शक्यता असते. यामुळे नफ्या-तोट्याचे समीकरण बदलणार हे निश्चित.
पण परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा व्यापा-यांची शारीरिक अवस्था कशी असते. अशा स्थितीत त्यांची ताण सहन करण्याची क्षमता मार खाते. अनिश्चिततेमुळे स्ट्रेस हार्मोन्समध्ये वाढ होते. मन वेचैन होते. अशा गोष्टींमध्ये धोके जाणवू लागतात जेथे ते नसतातच. नफा होत असताना ट्रेडर्स अत्याधिक धोके पत्करू शकतात, पण संकटाच्या वेळी अशा निर्णयाची अधिक आवश्यकता असताना मात्र ट्रेडर्स दोन पावले मागे सरकू शकतात.
शारीरिक क्रियांमधील हे बदल बँक व्यवस्थापकांनी समजून घेणे गरजेचे आहे. धोके पत्करण्याची क्षमता आकडेवारीत मांडता येत नाही. बँकेच्या व्यवस्थापकांनी अतिउत्साह, थकवा, ताण जाणवणे व तो नियंत्रित करण्यासंदर्भात क्रीडातज्ज्ञांचा कित्ता गिरवावा. क्रीडा प्रशिक्षक खेळाडूंचे व्यवस्थापन करतो तसेच त्यांनी करावे. म्हणजेच टेंडर, ग्राहक यांची शारीरिक क्रिया सामान्य होईपर्यंत त्यांना कधी कधी मैदानाबाहेरही ठेवावे लागेल.