आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील, पती, भाऊ गेला तरीही धैर्य कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : १९५८
वडील : मोहन कुमारमंगलम , आई-कल्याणी मुखर्जी
शिक्षण : दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी, मद्रास विद्यापीठातून एमबीए.
कुटुंब : पतीचे निधन, दोन मुली.
चर्चेत : विवाहित महिलांना फ्लॅक्सी टायमिंग दिले जावे, अशी कॉर्पोरेट्सना सूचना. आई झाल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढू नये.

प्रसिद्ध गायक येसुदास यांनी गेल्या वर्षी महिलांच्या जीन्स वापराबाबत टिप्पणी केली तेव्हा ललिता कुमारमंगलम यांनी त्यांना फटकारले होते. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध गायकाने असे वक्तव्य करायला नको, या शब्दांत त्यांना फटकारले. यामध्ये बेकायदेशीर काहीच नाही, मात्र अनैतिक मात्र आहे.

त्यांचे आजोबा पी. सुब्बारायन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मुख्यमंत्री होते. त्यांची आई पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री अजय मुखर्जी यांची भाची होती. त्यांचे भाऊ रंगराजन कुमारमंगलम राजकारणात होते. शिकत असतानाच त्या वडील मोहन यांच्यासोबत दिल्लीला आल्या होत्या. त्यांच्यासोबत साधारण १३ वर्षे राहिल्या. वडील इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात पोलादमंत्री होते. मात्र, एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. हा एक दुर्दैवी योगायोग म्हणायचा की, मोहन यांची नात ललिताची मोठी बहीण उमाचा मुलगा मुक्तेश मुखर्जीचा काही दिवसांपूर्वी मलेशियन एअरलाइन्सच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

काही वर्षांपर्यंत अशोक लिलँड आणि काही अन्य कंपन्यांमध्ये काम केले असल्यामुळे त्यंानी कॉर्पोरेट वर्ल्डसंदर्भात मत व्यक्त केले. १९८०-८२ दरम्यान ते अशोक लिलँडमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी होते. त्या वेळी मुलींना जबाबदारीचे काम सोपवले जात नव्हते. त्यामुळे नोकरी सोडली. पर्यटन उद्योगाचीही माहिती होती. त्या वेळी त्यांनी आणि काही मित्रांनी एनजीओ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि "प्रकृती'चा जन्म झाला.

त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. मोठी मुलगी वकील असून ती सर्बियात राहते. लहान मुलगी एनजीओ "प्रकृती'चे काम पाहते. २००४ मध्ये भाजपने त्यांना पुद्दुचेरीचे तिकीट दिले. कधीकाळी त्यांच्या वडिलांनी ही जागा लढवली होती. यानंतर पतीचा इथे कारखाना होता. १९८२ मध्ये पतीने कारखाना सुरू केला. मोठ्या मुलीचा जन्मही इथेच झाला. आई बंगालची होती. त्या येथील अरविंदो आश्रमात नियमित येत होत्या.