आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन, अँड्रॉइडच्या आव्हानामुळे ब्लॅकबेरीची रिंगटोन मंदावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही वर्षांपूर्वी रिसर्च इन मोशन (रिम) स्मार्ट फोनचा मोबाइल बाजारात दबदबा होता. ते स्टेटसचे प्रतीक समजले जात असे. पण ब्लॅकबेरी आता दर्जेदार मोबाइल तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत मागे पडत आहे. कंपनी पाच हजार कर्मचाºयांना चाळणी लावण्याचा विचार करीत आहे. मागील वर्षी कंपनीने 2000 कर्मचाºयांना चाळणी लावली होती. रिमची नवी आॅपरेटिंग सिस्टिम ‘ब्लॅकबेरी 10’ बाजारात उशिरा म्हणजेच 2013 पर्यंत येऊ शकेल.
अ‍ॅपलचा आयफोन आणि गुगलच्या अँड्रॉइडकडे ग्राहकांचा कल वाढल्याने ब्लॅकबेरीची बाजारातील भागीदारी 2007 मधील 50 टक्क्यांवरून आता 11 टक्क्यांवर आली आहे. रिमचे सीईओ थोर्स्टेन हिन्स यांनी वॉलस्ट्रीटच्या तज्ज्ञांना सांगितले की, जानेवारीत सीईओ पद स्वीकारल्यानंतर मी ज्या आव्हानांकडे लक्ष दिले त्याची झलक या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या निकालात दिसत आहे.
ब्लॅकबेरीच्या अडचणी तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. कॉर्पोरेट बाजारावर पकड मिळवल्यानंतर रिमला हे कळले नाही की, फोन क्रांती पुढे नेण्यात बिझनेस कस्टमर नाही, तर सामान्य ग्राहकांचाच हात असेल. मोबाइल सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या संशोधनांकडेही रिमने लक्ष दिले नाही. स्मार्ट फोन फक्त संवाद-संपर्काचे माध्यम नाही, तर मनोरंजनाचे साधनही होतील याचाही रिमला अंदाज आला नाही. पूर्ण की-बोर्डचे फोन तयार करण्यावर रिमचा भर असताना ग्राहक टचस्क्रीन पसंत करीत आहेत. शेवटी रिमने टचस्क्रीन फोन सादर केला तेव्हा तो आयफोनची भ्रष्ट नक्कल वाटत होता. रिमने ब्लॅकबेरी हा ई-मेलयुक्त सुंदर मोबाइल फोन बनवला होता. अ‍ॅपल व गुगलने मात्र मोबाइलला शक्तिशाली कॉम्प्युटरचे रूप दिले आहे. नावीन्याच्या आघाडीवर मागे राहण्याची किंमत रिमला चुकवावी लागली आहे.
- 11% मार्केट शेअर (2007 मध्ये 50 टक्के)
- 30% कर्मचारी कपात जूनमध्ये
- 90% घट शेअरच्या किमतीत 2008 नंतर