आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: भावनांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनांक हा शब्द हल्ली जरा जास्तच महत्त्वाचा झाला आहे. पूर्वी व्यक्तिची हुशारी ही त्याच्या बुध्‍यांकावरुन ठरवित. पण नंतर शास्त्रज्ञांनी मेंदूच्या रचनेचा, वाढीचा वेगवेगळ्या घटकांचा अभ्‍यास करायला सुरुवात केली. आणि असते लक्षांत कि व्यक्तिच्या विकासांत भावनांना अग्रगण्‍य स्थान आहे ! आणि आता तर त्यच्या यशामधे सुध्‍दा या भावनांकाचे प्रमाण काय आहे त्याचा नोकरीसाठी निवड-होण्‍यातही जास्त भाग आहे.

अपरिचित व्यक्ति गल्लीत दिसले म्हणजे ती मुलांचे अपहरण करण्‍यासाठी आली असे समजून दोघा चौघांनी त्याला पकडून मारायला सुरुवात केली आणि बघता-बघता जमावाने संतापाने खरे काय आहे याचा व‍िचार न करता त्याला ठार मारले. तो बिचारा एक मतिमंद माणूस होता. भावनांचा हा अतिरेक आणि तोही नकारात्मक भावनांचा माणसाचा पशू बनवतो. मानवाचे हे वैशिष्‍ट्ये आहे, की आपल्याला मेंदूची देणगी मिळाली आहे. त्यातूनच भावनांचा जन्म होतो. अगदी गर्भापासून योग्य संस्कार झाले तर योग्य भावना निर्माण होतात. त्यांना वळण लावणे, त्यांचा समतोल राखणे हे साध्‍य होते.
मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच सामाजिक भा‍वनिक, बौध्दिक विकास होत असतो. वयानुसार अनुभवानुसार भावना विशिष्‍ट रुप धारण करतात. त्यांना योग्य वळण माती-पिता कुटूंब, मित्र, शिक्षक व मग समाज लावू शकतो. प्रेम सहानुभूती, दया उत्सुकता, आनंद या सुखदायक, तर लज्जा,भिती या दु:खदायक नकारात्मक भावना आहेत. आपल्या आयुष्‍यांत या दोन्ही भावनांचे मिश्रण असते. पण व्यक्त‍िमध्‍ये ज्या भावना प्रबळ असताच तशी त्याची वृत्ती बनते. त्याच्या वागणुकीतून ते प्रतिबिंबीत होते.
शेजारची छोटशी भैरवी आपण हसून बोलल्यावर हसून इतका सुंदर प्रतिसाद देते, की माया दाटून येते. आपल्याला सगळ्यांनाच परिस्थितीचे समायोजन करावे लागते आणि मोठ्याकडून शिकावे लागते. सतत गुंडपणा करणारी व्यक्त‍ी शिव्या देते , लाथ मारणे, टपलीत मारणे असे करत मुलांना शाळेत या प्रवृत्तींचा त्रास होतो् उत्कृष्‍ट समजूतदार प्रेमळ व्यक्ती मुलांच्या भावनांना योग्य वळण लावू शकते.

समाजांत सध्‍या छोट्या-छोट्या कारणांवरुन स्फोटक परिस्थिती निर्माण होते. आनंदाचे सुध्‍दा विकृत‍िकरण होते. झिंग येई पर्यंत होळी खेळणे, दगड फेकत सुटणे. भावना संतुलित असल्या, तर शारीरिक विकास उत्तम होतो. ग्रंथींमधून योग्य हार्मोन्स स्त्रवतात वा वाढ छान होते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भावनांचे प्राबल्य वेगळे असते. आनंदी , प्रेमळ, समजूतदार मुले लोकप्रिय होतात. बौध्दिक वाढीचाही यावर परिणाम होतो. लहानपणाचे अनुभव खूप शिकवून जातात. अध्‍ययन व अनुकरण याचे पण महत्त्व आहे. भावना दाबून न ठेवता प्रकट केल्या पाहिजेत. एखादी गोष्‍ट आवडली की लहान मुल टाळ्या वाजवते, हसते, उड्या मारणे, लहानपणा भावना उत्कट असतात. रागपण हातपाय आपटून व्यक्त होतो.
मोठेपणी संयम बाळगायला शिकवले जाते. किशोर वयात औपचारिकपणा वाढतो. शारीरिक बदलांमुळे भावनाप्रधानता वाढते. या वयांत मार्गदर्शन लागते. विरुध्‍द लिंगी व्यक्तिबाबत नाजूक भावना निर्माण होतात! त्यागाची भावना महत्त्वाची असतो. प्रौढावस्थेत भावनांना विचारांची जोड द्यावी लागते. आजकाल भावनांका करताना होतात. भावनांचे स्थायीभाव निर्माण होतात. त्या व्यक्तिमत्त्वाचे ते वैशिष्‍ट्य ठरते. पु.ल. देशपांडे म्हणजे प्रसन्नता!

मित्रहो स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवाय आणि इतरांनाही मदत करा आपल्याला शेवटी समाजांत जगायचे आहे. जेवढा आनंद वाटता येईल. तेवढा वाटा. आणि कुरुप भावना मनातून काढून टाका! लक्षांत राहू दे. मोठ्या मनाने माफ करणे माणसाला दिलदार करते.भावनांक ही यशाची गुरुकिल्ली आहे. आजकालच्या या स्मायलीच्या जगांत फक्त स्मायलच जवळ ठेवा! इतर नकारात्मक चेहरे नकोत.