आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blog: सब \'रॉन्ग नंबर\' है भाई!, \'तो\' स्वतः घाव का घालतोय?, विचार करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* वर्ष 2003: नाशकात कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 39 ठार.
* वर्ष 2005 मध्ये मांढरदेवी चेंगराचेंगरीत 340 ठार.
* वर्ष 2008: हिमाचल प्रदेशातील नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 160 जणांचा मृत्यू.
* वर्ष 2013 मध्ये उत्तराखंड महाप्रलयात 10 हजारपेक्षा अधिक ठार, अनेक जण बेपत्ता.
* आणि आता मक्का येथे सैतानाला दगड मारण्यासाठी गेलेल्या 800 हज यात्रेकरूंचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू!
हे चालायचंच! प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाली, की असे होणारच. त्याचा दोष देव, अल्ला, ईश्वराला का द्यावा? ही सर्वसामान्य तर्कहीन मनातील पहिली प्रतिक्रिया ठरलेलीच!
असो! देवभोळे, धर्मभोळे लोक अशा ठिकाणी कशासाठी जातात? पापं धुण्यासाठी, जीवन सत्मार्गी लागण्यासाठी, आर्थिक भरभराट होण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी...... आणिक बऱ्याच कशासाठी! हे केले म्हणजे आपल्या डोक्यावर 'त्याचा' हात कायम राहील, आपले वाईट होणार नाही, हीदेखील एक साधारण भावना असतेच.
आता परत एकदा वरील घटनांवर नजर मारा. माणूस चांगले व्हावे, या हेतूनेच तथाकथित धार्मिक स्थळी जातो ना? तरीही, अशा घटना का घडाव्यात? माणसाचे जीवनक्रम चालवणारी एक अदृश्य शक्ती (देव, अल्लाह, वगैरे...) आहे, ही मनाच्या 'देव्हाऱ्यात' घट्ट बसलेली समजूत आहे. तिला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ती तेवढ़याच ताकदिने जागीच रोवून बसते.
आता या घटना वाचल्यानंतर तरी ती समजूत गैर आहे की योग्य, एवढाच विचार करा. असा विचार करणे म्हणजे 'त्याच्या'वर अविश्वास दाखविल्यासारखे होईल, असाही विचार तुमच्या मनात येईल. पण एकदा दाखवा अविश्वास. चालत्या बोलत्या मानसांवर अविश्वास दाखविनारे आपण कधीही न दिसलेल्या 'त्याच्या'वर अविश्वास दाखवायाला का घाबरता?
सगळं चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे; तर मग त्याच्याच दारात असा रक्तपात का होतो? ही सृष्टी सारी त्याचीच निर्मिती आहे (दंतकथा) तर स्वनिर्मितीवरच 'तो' स्वतः घाव का घालतोय?
सब 'रॉन्ग नंबर' है भाई!
पुढील स्लाईडवर पाहा, भारतात अजून कुठे कुठे अशा प्रकारे देवस्थानांमध्ये अपघात झाले आहेत...