आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BLOG: Qestions Within Question....But Answer Still Not Found

BLOG: प्रश्नातून प्रश्न... प्रश्न हे सुटेना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनातच जागतिक स्तरावर चित्रकलेसाठी बक्षिसे मिळवणार्‍या रवीने शालेय शिक्षणानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ला प्रवेश घेण्याचे निश्चित केले होते. तो अभ्यासात तसा फार पुढे नव्हता पण त्याला ज्यात गती होती त्या चित्रकलेतच त्याला पुढे करिअर करायचे होते. पण आयुष्यात पैसाच सर्वात महत्वाचा आणि वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून तसेच जगणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे अशी ठाम धारणा असलेल्या रवीच्या आईने आदळआपट करून त्याला इंजिनीअरींगला प्रवेश घ्यायला भाग पाडले. पहिल्याच वर्षी रवी नापास झाला पण इंजिनीअरींगला असे होतच असते असे म्हणून आईने त्याला पुन्हा परीक्षेची तयारी करायला लावली. हे शिक्षण नको, मी आतासुद्धा माझ्या आवडत्या कोर्सला अॅडमिशन घेऊ शकतो असे त्याने सांगूनही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले गेले. पण पुढच्या अनेक परीक्षांमधूनही तोच निकाल लागत राहिला आणि रवीला डिग्री कोर्समधून काढून डिप्लोमाला घातले. कसाबसा रडतखडत डिप्लोमा पूर्ण करून चित्रकार रवी एक अतिसामान्य यथातथा इंजिनीअर होऊन बाहेर पडला. पण या पूर्ण प्रवासादरम्यान आईबद्दल आणि तिला विरोध न करणार्‍या वडिलांबद्दल त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न झाला होता. तो जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहू लागला. हळूहळू त्याला दारूचे व्यसन लागले. आईवडिलांवर असलेला राग व्यक्त करण्यासाठी तो दारू पिऊन घरी येऊ लागला आणि पुढे तर आई वडिलांना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, दुराग्रही व्यक्तीमुळे पूर्ण घराची झाली वाताहत..!