आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरातच आहे कर्करोगावरील उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅटलिन जॉन्सन हिचा उत्साह आणि शंका ७ वर्षे वयाच्या एखाद्या सामान्य मुलासारख्या होत्या. ती १८ महिन्यांची असतानापासून तिचे आयुष्य सामान्य राहिले नव्हते. ल्युकेमियाचा उपचार सुरू होता. तिचा बहुतांश वेळ रुग्णालय आणि डॉक्टरांसह व्यतीत होत. अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया लहान मुलांमध्ये कर्करोगाचे सर्वत्र आढळणारे रूप आहे. लहान मुलांमधील कर्करोगाचे एक चतुर्थांश रुग्ण हेच आहेत. यातून सुटका होणे कठीण असते. ल्युकेमियाने पीडित ८५ ते ९०% रुग्णांना किमोथेरपीमुळे फायदा होऊ शकतो, परंतु याचा परत हल्ला झाला तर समस्या उग्ररूप धारण करते. बहुतांश रुग्णांसोबत हेच होते. किमोथेरपीमुळे त्यांचे आयुष्य थोडे वाढू शकते. मात्र यातून सुटका होत नाही. 
 
तीन वर्षे सतत उपचार आणि किमोथेरपीनंतर कॅटलिनचा कर्करोग नियंत्रणात येऊ शकला नाही. डॉक्टरांनी एक जोखीम पत्करली. एका प्रायोगिक उपचारासाठी तयारी दाखवण्याची त्यांनी तिला विनंती केली. यात प्रथमच जनुकांचा वापर या उपचारासाठी करण्यात आला. या प्रक्रियेत रुग्णाच्या प्रतिरोधक तंत्राने कर्करोगाचे निदान करायचे होते. त्याचा खात्मा करण्याचेही तंत्र याद्वारे विकसित करण्यात आले. प्रतिरोधक तंत्र विषाणू वा बॅक्टेरियाला शरीरातून संपवून टाकण्याचे काम करतात. कर्करोगाच्या उपचारासाठी ही प्रतिकार उपचार पद्धती नावीन्यपूर्ण आहे. कर्करोगाला शरीराच्या आतून घालवण्यास ही मदत करते. २०१५ मध्ये सतत ८ आठवडे तिला हा उपचार देण्यात आला. याचा लाभ झाला. तिच्या शरीरातील कर्करोग कोशिका पूर्णत: नष्ट झाल्या. कॅटलिनचा जीव तिच्या शरीरातील प्रतिकार करणाऱ्या जनुकांनी वाचवला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील डॉ. डेव्हिड पोर्टर यांच्या मते, या पद्धतीमुळे ९०% रुग्णांना फायदा होऊ शकतो.  

प्रतिकार क्षमतेवर आधारित कर्करोगाच्या उपचाराची सुरुवात २०११ मध्ये इंट्राव्हेनस ड्रग्जद्वारे (नसांच्या माध्यमातून शरीरावर पोहोचवली जाणारी आैषध) झाली. आता डॉक्टर प्रतिरोधक पेशींमध्ये अानुवंशिक बदल करून सिमेरिक अँटिजेन रिसेप्टर (सीएआर) टी पेशी तयार करतात. कॅटलिनच्या बाबतीत असेच झाले. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनच्या तुलनेत हा कर्करोग उपचाराचा सर्वात चांगला मार्ग आहे. सीएआर टी पेशींद्वारे होणारा उपचार आशेचा किरण आहे. हे रुग्णाच्या शरीरात तयार होणारेच आैषध आहे. हा उपचार कॅप्सूल किंवा इतर आैषध घेण्यासारखे नाही. हा एकदाच केला जातो. शरीराला कर्करोगाशी लढण्यास हा तयार करतो. ल्युकेमिया, लिम्फोमाच्या उपचारांसाठी ही पद्धती योग्य आहे. उपचाराचा हा  पूर्णत: नवा मार्ग आहे.  

अन्न आणि आैषध प्रशासनाच्या एका सल्लागार समितीने जुलैमध्ये चाचणी केवळ प्रायोगिक तत्त्वावर करू नये अशी शिफारस केली आहे. सर्व कर्करुग्णांना याचा लाभ मिळावा. एफडीए याला मान्य करण्यास बाध्य नसून येत्या काही आठवड्यांत याविषयी निर्णय होऊ शकतो. काही रुग्णांना जरी यातून सुटका मिळाली तर अमेरिकेतील कर्करुग्णांवर वर्षाला खर्च होणाऱ्या १२० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेत मोठी घट होईल. प्रतिरोधक कोशिकांचा वापर करण्याचा विचार दीर्घकाळापासून विचाराधीन आहे. मात्र याला अद्याप यश आले नव्हते. संसर्ग निर्माण करणाऱ्या विषाणूंचा मारा बाहेरून होतो, मात्र प्रतिकार करणाऱ्या कोशिका आतच असतात.  

उपचार प्रभावी असल्याचे सिद्ध करणारे डॉ. कार्ल जून यांनी सांगितले की, अंदाजे ३० वर्षे यावर संशोधन सुरू आहे. कर्करोगाला नष्ट करणाऱ्या कोशिका शरीरात असतात हे त्यांना इतक्या दीर्घ संशोधनानंतर कळाले. ल्युकेमियाच्या रुग्णांमध्ये प्रतिकाराचा घटक सीडी १९ आहे. हे एक प्रथिन आहे. कर्करोग कोशिकांच्या पृष्ठभागावर हे असते. जून यांनी प्रतिकार कोशिकांमध्ये बदल केले. त्यामुळे सीडी १९ ला ते प्रतिसाद देतात. सोबतच इतर तत्त्वांच्या मदतीने प्रतिकार कोशिकांना कर्करोगाच्या सक्षम प्रतिकारासाठी तयार करतात. प्रतिरोधक कोशिकांमध्ये आनुवंशिक बदल आणि प्रयोगशाळेत यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याची पद्धत शोधून काढल्यानंतर त्यांच्या चमूने ल्युकेमियाने पीडित जनावरांवर याचा प्रयोग केला.  

उंदरावर याची चाचणी यशस्वी ठरली. जूनने २०१० ते २०११ पर्यंत माणसांवर याच्या परीक्षणासाठी राष्ट्रीय कर्करोग संस्थेकडून निधीसाठी अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावला. याच्या दोन वर्षांनंतर जूनला ल्युकेमिया आणि लिम्फोमा सोसायटीच्या रूपात खासगी गुंतवणूकदार मिळाला. त्यांनी मानवावर चाचणी करण्यासाठी ५० लाख डॉलर्सचा निधी दिला. ३१ जुलै २०१० रोजी  बिल लुडविग सीएआर टी सेल थेरपी घेणारे पहिले रुग्ण ठरले. लुडविग यांना १० वर्षांपासून या व्याधीने ग्रासले होते. गेल्या ७ वर्षांत त्यांची प्रकृती सुधारली आहे. रुग्णाच्या शरीरात प्रतिकारक्षमता कमी असेल तर त्यांना साइड इफेक्ट होऊ शकतो. कारण त्यांच्या शरीरातील काही कोशिका नष्ट झालेल्या असतात.  

प्रयोगशाळेत निर्मित सीएआर टी पेशी  कर्करोग कोशिकांचा खात्मा करण्यास सक्षम आहेत. त्यांना रुग्णाच्या शरीरात पोहोचवणे कठीण आहे. मात्र एकदा शरीरात गेल्यावर त्या जिवंत राहतात. त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढते. त्यामुळे ही उपचार पद्धती आयुष्यभर उपयुक्त ठरू शकते अशी डॉक्टरांना आशा आहे. या उपचार पद्धतीला वापरण्याची परवानगी त्यांना मिळेल अशी आशा आहे. कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नसलेल्या रुग्णांवर याचा प्रयोग करण्याची परवानगी दिली जावी. काही कालावधीनंतर डॉक्टर याविषयी उपयुक्तता पटवून देतील. उपचारानंतर शरीराच्या प्रतिकार क्षमतेवर काय परिणाम होईल हे अद्याप उलगलडे नाही. अनेक रुग्ण या उपचारादरम्यान दगावले आहेत.  

सीएरआर टी पेशी महाग आहेत. रुग्णांना यासाठी लाखो डॉलर्स खर्च करावे लागतात. आैषध कंपनी नोव्हार्टिसने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाकडून यासाठी परवाना घेतला आहे. मंजुरी मिळाली तर या वर्षाखेरीस ३५ कर्करोग उपचार केंद्रांत ही लागू केली जाईल. दुसरीकडे इतर कंपन्यादेखील युनिव्हर्सल टी सेल विकसित करत आहेत. या प्रत्येक प्रकारच्या  कर्करुग्णांना चालू शकतात.
बातम्या आणखी आहेत...