आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय चित्रपटसृष्टीः 2 वर्षे, 10 हजार स्क्रीन, 100 कोटींचा गल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील चित्रपटांना बॉक्स ऑफिसकडून 85 टक्के उत्पन्न मिळते. म्हणजेच चित्रपट हिट किंवा फ्लॉप करण्याची कसोटी म्हणजे प्रेक्षक. याउलट हॉलीवूडचे चित्रपट निर्माते बॉक्स ऑफिसवर अवलंबून नाहीत. तेथे बॉक्स ऑफिसकडून 30 टक्केच कलेक्शन होते. उर्वरित उत्पन्न उपग्रह हक्क, संगीतविषयक हक्क, टीव्ही हक्क आणि इतर प्रयोजकत्वाद्वारे मिळते. तीन आठवड्यांत 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणार्‍या चेन्नई एक्स्प्रेसचा मुख्य अभिनेता शाहरुख खान म्हणतो, आता आम्हाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी रुपयांच्या कलेक्शनवर बोलायला हवे. भारतातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृह पहिल्याच दिवशी शंभर कोटी कमावण्यासाठी तयार आहेत..

‘‘चित्रपट प्रदर्शनाची वेळ आणि मार्केटिंगसाठी ज्या प्रकारची आक्रमक रणनीती आखली जात आहे, त्यावरून असे वाटते की, भारतीय चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरून शंभर कोटी रुपयांची कमाई करतील, असा दिवस दूर नाही. मात्र त्यासाठी अजूनही दोन वर्षे लागतील; पण यासाठी अजून दोन वर्षे लागतील. कारण तोपर्यंत यासाठी आवश्यक तेवढे मल्टिप्लेक्स सुरू होतील. तरण आदर्श - चित्रपट समीक्षक आणि जाणकार

भारतात 2015 पर्यंत ही स्थिती येईल, कारण
1> 1925 नवे मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर 8000 स्क्रीन वाढतील, असा अंदाज (फिक्की-केपीएमजी अहवाल)
2> तसेच 10,000 सिंग्लेक्स चित्रपटगृहे सुरू होणार
3> म्हणजेच या 18,000 स्क्रीनपैकी 10,000 स्क्रीन बुक करणे सोपे होईल.