आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ जर्मनीची भारतीय वारकरी... सिल्व्हिया माउलींच्या दिंडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळच्या जर्मनीतील सिल्व्हिया वागर्नर या आता अपर्णा घोष बनल्या आहेत. त्या चेन्नईत राहतात. बंगालमधील भरतनाट्यमचे गुरू घोष यांच्याशी त्यांनी लग्न करून त्या भारतीय बनल्या. गेल्या सहा वर्षांपासून त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी हाेत अाहेत.
शिस्तबद्ध वारीचा अनुभव

अपर्णा उत्तम हिंदी बोलतात. संस्कृतही शिकत आहेत. वारकरी संप्रदाय हेच जीवनाचे अध्यात्म आहे. तो मी स्वीकारल्याचे अपर्णा यांनी सांगितले.

जर्मनीतील इंडोलॉजीच्या पदवीधर आहेत. कथ्थकमध्ये करिअर करायचे होते. अाता संतांच्या ओवींचे अध्ययन.

बाबा महाराज सातारकरांच्या दिंडीत त्या मागील चार वर्षांपासून सहभागी होत आहेत. प्रथम एकट्याच सहभागी व्हायच्या. आता शिस्तबद्ध वारी अनुभवता येते. असे त्या म्हणतात.
मूर्ती, मंदिर, अध्यात्म हा माझ्या केवळ अभ्यासाचाच भाग नाही तर हे माझे जीवन आहे. विठ्ठलाच्या पायावर लीन होणे, ही लाखो वारकऱ्यांची मनीषा असते. माणुसकी जपणारा वारकरी मला पाहायला मिळतो. - अपर्णा घाेष