आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Both Mother Father IItians Topper, Daughter Bollywood Actress

युनिक: आई-वडील दोघे आयआयटीयन्स टॉपर, मुलगी बॉलीवूड अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय समाजाच्या एका कार्यक्रमात आपल्या कुटुंबीयांसोबत पल्लवी.
पल्लवी शारदा, अभिनेत्री
जन्म: ५ मार्च १९६८
कुटुंब: वडील डॉ. नलिन शारदा,आई- डॉ. हेमा शारदा, मोठा भाऊ अंकूर शहा
चर्चेत: बॉबॉलीवूडमध्ये येणारी पहिली ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, तिचा हवाईजादा चित्रपट
या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


पल्लवी तीन वर्षांची असताना त्यांनी आई-वडिलांना भरतनाट्यमचा क्लास लावण्याची मागणी केली. मुलगी प्रत्येक वर्गात अव्वल ठरत होती, मात्र नृत्यावर तिचे पहिले प्रेम होते. मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठीही आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले. मुलगी मुंबईत एकटी राहणार म्हटल्यावर आई काळजीत पडली. पल्लवी अनेक देशांमध्ये वाढली आहे. मात्र, आई डॉ. नलिन शारदा यांनी यादरम्यान मुलांना हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलांनी हिंदी शिकावे, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी हिंदी चित्रपट योग्य माध्यम होते.

पल्लवी यांचे वडील डॉ. शारदा पंजाबमधील आहेत. त्यांनी दिल्ली आयआयटीतून बीटेक केले. टेल्को, एल अँड टी आणि श्लमबर्गरसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांची नोकरीची ऑफर मिळाली. शिक्षणाच्या आवडीमुळे त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला. हेमा यांच्याशी त्यांची भेट झाली. त्या तेव्हा आयआयटी दिल्लीत एमटेक करत होत्या. पीएचडीनंतर डॉ. शारदा पत्नी आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात आले. इथे हेमा यांनी पीएचडी केले. यादरम्यान पर्थमध्ये पल्लवीचा जन्म झाला. वडील कर्टिन विद्यापीठात प्राध्यापक झाले होते. यानंतर ते मुर्डोक आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ ऑस्ट्रेलिया, फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठ यूएस, विद्यापीठात शिकवतात. शाळेत तिने आठवीनंतर दहावीत प्रवेश घेतला. नंतर लॉ आणि मीडिया कम्युनिकेशनसह फ्रेंच डिप्लाेमा करत २ पदव्यांसाठी प्रवेश घेतला.
शिक्षण संपल्यानंतर पल्लवी भारतात आली. तिने कामाची शोधाशोध सुरू केली.सकाळी संशोधनासाठी ग्रंथालय आणि सायंकाळी अॅक्टिंग स्कूलला जात असे. दहा वर्षांची होती तेव्हा अभिनेत्री शबाना आझमींसमोर कला सादर केली होती. त्यावर आनंद व्यक्त करत शबाना म्हणाल्या, ‘पल्लवी, मला नृत्य शिकवले तर माझ्या करिअरमध्ये सुधारणा होईल.’ त्यांनी शेक्सपियरवर एका नाटकात भरतनाट्यम व बॉलीवूड स्टाइल नृत्य केले होते. मेलबर्नमध्ये क्लासिकल, भांगडा व बॉलीवूड डान्सही शिकवत होती.