आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतंत्र देशासाठी १० वर्षांपासून जगभर सुरू आहे भटकंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मदग बुग्ती, बलूच नेता
वय - ३३ वर्षे
वडील - रेहन बुग्ती
शिक्षण - सिबी विद्यापीठ, बलुचिस्तानमधून शिक्षण
चर्चेत का? - १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाची प्रशंसा करत त्यांनी भारताची मदत मागितली आहे. तेच बलुचींचे प्रतिनिधी आहेत.

२००६ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान आणि अल-कायदाने एक कार बॉम्बस्फोट केला होता. त्यात तीन घरांचे नुकसान झाले होते. स्फोट झाला त्याच्या पुढेच ब्रह्मदग राहत होते. अफगाणिस्तानच्या गुप्तचर सूत्रांनी त्यांना सावध केले होते. सुदैवाने हल्लेखोरांनी चुकीच्या घरावर हल्ला केला होता.

ब्रह्मदग खान बलुचिस्तानच्या बलूच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आहेत. पाकिस्तान त्यांना दहशतवादी म्हणतो, पण ते प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांनीच वडील रेहन खान यांचे निधन झाले. त्यामुळे आजोबा अकबर बुग्ती यांनीच त्यांचे पालनपोषण केले. आजोबा बुग्ती आदिवासींचे प्रमुख होते. ते पाकिस्तानच्या बलूच प्रांताचे गृहमंत्री होते. बलुचिस्तानची स्वायत्तता हे त्यांचे स्वप्न होते. ते पाहतच ब्रह्मदगही वाढले आहेत. आजोबांनी २००६ पर्यंत ही लढाई लढली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने एका हल्ल्यात अकबर यांना ठार केले. त्यानंतर ब्रह्मदग तेथून पळाले. तेव्हापासून जगभर भटकंती सुरू आहे. चार वर्षांपूर्वी एका विवाह समारंभातून परतत असताना त्यांची बहीण जामू डमकी आणि तिच्या मुलीची हत्या झाली. लढाईत महिलांची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. बुग्ती कुटुंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारे गप्प करण्याची पाकिस्तानी गुप्तचर संंस्थेची इच्छा आहे. ब्रह्मदग सांगतात की, आजोबांच्या हत्येनंतर मला देश सोडून पळून जावे लागले, कारण हत्येची भीती होती. पाकिस्तानला बलुचिस्तानमधील छळाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्यानंतर ब्रह्मदग यांनी मोदींचे आभार मानले. आम्हाला उघड पाठिंबा देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

वाद प्रामुख्याने २००० नंतर सुरू झाला. ब्रह्मदग सांगतात की, चीनच्या गुंतवणूकदारांनी आपल्या भागातून संसाधने नेण्यास आजोबांचा विरोध होता. त्यानंतरच पाकिस्तान त्यांच्याविरोधात गेला. आजोबांच्या मृत्यूनंतर ते अफगाणिस्तानात पळाले, पण तेथे अल-कायदा आणि तालिबानचा त्यांना विरोध होता. त्यामुळे ते अफगाणिस्तानमधून स्वित्झर्लंडला गेले. तेथे त्यांनी आश्रय मागितला, पण स्वित्झर्लंडच्या सरकारने नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...