आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठीण परिस्थितीत लवचिकतेचे विज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई रुग्णालयात इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन डॉ. डेनिस चार्नी यांना माहीत आहे की, त्यांची पाचही मुले त्यांचा त्या वेळी तिरस्कार करायची जेव्हा ते खतरनाक अ‍ॅडव्हेंचर ट्रीपसाठी त्यांना घेऊन जायचे. चार्नी मुलगा अ‍ॅलेक्सला कायाकिंग ट्रीपवर घेऊन गेले होते. त्यांचे मित्र डॉ. स्टीव्हन साऊथविकही त्यांच्यासोबत होते. अ‍ॅलेक्सला वडिलांसोबत रोज मोडकळीस आलेल्या नावेत जवळपास १८ किमी प्रवास करावा लागत होता. प्रवास संपल्यावर अ‍ॅलेक्सने वडिलांना सांगितले की तो कधीही त्यांच्याशी बोलणार नाही.

मानसोपचारतज्ञ असल्याने चार्नी यांना माहीत आहे, लोकांना त्यांच्या सुरक्षित क्षेत्रातून बाहेर नेल्यास त्यांना फायदा होतो. चार्नी आणि साऊथविकने दोन दशकांपर्यंत प्रतिरोध क्षमतेच्या विज्ञानाचा (सायन्स ऑफ रिजिलिएन्स) अभ्यास केला. सावरण्याची क्षमता एक प्रकारचे कौशल्य आहे, जे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यास मदत करते. रिजिलिएन्सला मानसिक लवचिकपणा म्हणता येईल. ज्या प्रकारे दाबल्यानंतर रबर परतते त्याचप्रमाणे रिजिलिएंट व्यक्ती करतात.

आधुनिक इमेजिंगमुळे नसतज्ञ (न्यूरो सायंटिस्ट) तणावपूर्ण परिस्थिती मंेदूची संरचना आणि त्याचे काम बदलू शकते. हेही समजले आहे की, रिजिलिएन्सचे प्रशिक्षण मेंदूला बदलू शकते. येल मेडिसिन स्कूलमधील मनोविकारतज्ञ प्रोफेसर साऊथविक म्हणतात, थोड्या सरावाने कोणीही व्यक्ती रिजिलिएन्स विकसित करतात. घरात पत्नीशी तक्रार, ऑफिसमध्ये वरिष्ठांचे ओरडणे, वाहतूक कोंडी, वीज, टेलिफोन बिल यासारख्या गोष्टींचा मेंदूवर ताण पडतो. हृदयरोग, अल्झायमरसारख्या मेंदूच्या गडबडीसह अनेक आधुनिक आजारांचे कारण ताण हेच आहे.

विस्कान्सिन युनिव्हर्सिटीतील न्यूरो सायंटिस्ट रिचर्ड डेव्हिडसन यांचे मत आहे की, मेंदूतील अनुभव व प्लॅनिंग करणारे भाग प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि धोके लक्षात घेणारा भावनात्मक भाग एमिगडालाच्या मध्ये कनेक्शनची रिजिलियन्समध्ये महत्त्वाची भूमिका आहे. डेव्हिडसन त्यांचे पुस्तक "द इमोशनल लाइफ ऑफ युवर ब्रेन'मध्ये लिहितात : मजबूत कनेक्शन असल्यावर प्री फ्रंटल कॉर्टेक्स भावनात्मक एमिगडालाला लवकर शांत राहण्यासाठी सांगू शकतो.

संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्यामुळे तुम्हाला भीती वाटते, त्यांचा सामना करण्याने मेंदूचे भयाचे सर्किट कमजोर होते. सामाजिक सलोख्याचे मजबूत नेटवर्कही प्रतिरोधाची क्षमता वाढवते.

रिजिलिएन्सवरील नवीन प्रयोगाचा फोकस मानसिक एकाग्रतेवर आहे. या क्षेत्रात अधिक लोक सुधार करू शकतात. हार्वर्डच्या एका अभ्यासात समोर आले आहे की, लोक आपल्या दिवसातील ४७ टक्के वेळ त्या गोष्टींचा विचार करण्यात घालवतात, ज्या ते करत नसतात.डेव्हिडसनने १९९२ मध्ये दलाई लामांना पत्र लिहून विचारले होते की, ध्यान आणि बौद्ध भिक्खूंच्या मेंदूची रचना किंवा कामात कसे परिवर्तन आले आहे? दलाई लामा यांनी पत्राच्या उत्तरात आग्रह धरला होता की, डेव्हिडसन मेंदूवर शरीराच्या खराब होणार्‍या भागाचा, चिंता आणि भयाच्या परिणामासारखा दया आणि उदारतेच्या प्रभावाचाही परिणाम होतो.

डेव्हिडसनने भिक्खूंसह ध्यान करणार्‍या सर्वांच्या ब्रेनचे इमेजिंग केले.अधिक काळ ध्यान करणार्‍याचा मेंदू तणावातून लवकर बाहेर आला.

लवचिकता मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
1. कोणतीही घटना आपल्याला विचलित करू शकत नाही हा विश्वास ठेवा.
2. तणाव, दबाव किंवा आघात निर्माण करणार्‍या घटनांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा.
3. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा.
4. सक्षमपणे परिस्थिती हाताळणार्‍या व्यक्तीचा सल्ला घ्या.
5. ज्यामुळे भीती वाटते त्याचा सामना करा, पळू नका.
6. परिस्थिती खराब झाल्यास तत्काळ मदत घ्या.
7. शक्य असेल तेवढ्या नवीन गोष्टी शिका.
8. व्यायाम नियमितपणे करा.
9. आपल्यावर होणार्‍या टीकेपासून वाचा. भूतकाळातील घटना आठवू नका.
10. आपली सक्षमता आणि सकारात्मकतेला ओळखा आणि त्यावर कायम राहा.
नेव्ही मानसिकरीत्या मजबूत
भावनांवर रिजिलिएंट मेंदू वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. लाॅरिएट ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूटचे सायंटिफिक डायरेक्टर मार्टिन पाऊलस यांनी अमेरिकी सेनेतील नेव्ही सील्सच्या रिजिलिएंटवर ब्रेन इमेजिंगचे अनेक प्रयोग केले. नेव्ही सील्सच्या मेंदूने सरासरी मेंदूच्या तुलनेत भावनांवर वेगवान प्रतिक्रिया दिली. पाऊलस यांना आपल्या प्रयोगात समजले की, चिंता किंवा शरीराचा खराब झालेला भाग असलेल्या व्यक्तींमध्ये भावनांपासून सुटका करण्यात अडचणी येतात. ते नेहमी भावनात्मक प्रक्रियेत अडकलेले होते. दुसरीकडे नेव्ही सील्स आपल्या भावनाप्रधान अनुभवांना चिकटून नव्हते.

मेंदूचा व्यायाम
न्यूरोसायंटिस्ट डेव्हिडसन म्हणतात, कठीण आणि समस्येच्या वेळी होणार्‍या प्रतिक्रियेत रिजिलिएन्सला समजले जाऊ शकते. त्यांच्या प्रयोगातून समोर आले आहे की, छोट्या समस्यांचा सामना करणार्‍या प्रकारामुळे गंभीर समस्येच्या वेळी आपल्याला वर्तणुकीचा भास होतो. चार्नी आणि साऊथविकने त्यांच्या पुस्तकात (रिजिलिएन्स : द सायन्स ऑफ मास्टरिंग लाइफ्स ग्रेटेस्ट चॅलेंजेस) असे काही सल्ले दिले आहेत. चार्नी यांचे म्हणणे आहे की, रिजिलिएन्ससाठी कोणता एक प्रकार उपयोगी नाही. तुम्हाला तुमचा काम करण्याचा मार्ग शोधावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...