आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्या उपचाराची गरजच नाही असाही कर्करोग अस्तित्वात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहा वर्षांच्या तुलनेत आज स्तनांचा कर्करोग अतिशय वेगळा आहे. या भयानक आजारासंबंधी डॉक्टर खूपच खोलवर माहिती ठेवतात. कारणे आणि उपचारांप्रती सजग असतात. या वर्षी सुरू झालेल्या अभ्यासातून अनेक नवी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक स्तनाच्या कर्करोगाचा उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन. यावर अनुकूल प्रतिक्रिया येणे गरजेचे नाही. याचे गंभीर साइड इफेक्ट असतात तसेच अगदी कमी प्रमाणात महिलांचे आयुष्य वाढते. स्तनांचे सर्वच ट्यूमर पसरत नाहीत, हे डॉक्टरांना आढळले आहे. मग प्रश्न हा आहे की, कोणत्या स्थितीला कर्करोग मानायचे?

अमेरिकन कर्करोग सोसायटीचे प्रमुख मेडिकल आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ.अोटिस ब्राली म्हणतात की, डॉक्टर आणि रुग्णांनाही हे स्वीकारणे कठीण आहे की, असाही कर्करोग आहे ज्याच्या उपचाराची गरजच नाही. असा विचार म्हणजे कर्करोगाप्रती असलेला नवा विचारच नाही का? आजकाल स्तनांच्या कर्करोग उपचाराला दिशा देणारे तीन प्रमुख परिवर्तन कोणते ते आता पाहू.
डॉक्टर सल्ला देतात की, ४० वर्षे वयानंतर महिलांनी मेमोग्राम करावा. काही दिवसांपूर्वीच पब्लिक हेल्थ ग्रुपने बहुतांश महिलांसाठी वयाच्या पन्नाशीनंतर मेमोग्रामची शिफारस केली आहे. तपासणीचे योग्य वर्ष शोधण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्तन कर्करोगाच्या तज्ञ डॉ.लारा एसेरमॅन एका अभ्यास गटाचे नेतृत्त्व करतील. अमेरिकेत जवळपास एक लाख महिलांना तपासणीचे वैयक्तिक अधिकार देण्यात येणार आहेत. वैयक्तिक जोखमीवर महिला तपासणीचा निर्णय घेतील. अभ्यासाच्या निष्कर्षानंतर कळेल की सर्वच महिलांसाठी वयाची चाळीशी तपासणीचे योग्य वय आहे की नाही.

स्तनाचा कर्करोग जेनेटिक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणामुळे होतो. तुमचा डीएनए, धुम्रपान सारख्या सवयींमुळे जणुकीय परिवर्तन, व्यायामाचे प्रमाण, रेडिएशनप्रती एक्सपोजर, काय खाता, किती झोपता अशी कारणे कर्करोगास कारणीभूत ठरतात.

अशी अनेक पुरावे मिळाले आहेत की लाइफस्टाइल संबंधित धोक्यांशिवाय स्तनाच्या कर्करोगाची इतरही अनेक कारणे आहेत. वातावरणातील वेगवेगळी रसायने आणि विषारी पदार्थ स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. प्लॅस्टिक आणि टीन कॅनमध्ये वापरणे जाणारे केमिकल बीपीए आणि घरगुती वापरातील काही रासायनिक पदार्थही हानीकारक आहेत.

स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांचे हेच उपचार आहेत- शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी. बोस्टन ब्रिघम वुमन्स रुग्णालयातील कर्करोग तज्ञ डॉ. मेहरा गोलशन सांगतात, प्रत्येक महिलेला एकच प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे माझा कर्करोग पसरणार नाही, हे कसे समजेल.

त्यामुळे प्रत्येक महिला आणि डॉक्टर उपचाराच्या सर्व पद्धती वापरतात. मात्र अनेकदा ही आक्रमक पद्धती गरजेपेक्षा अधिक होते.
डॉक्टर तसेच रुग्णांच्या गळी एक गोष्ट उतरणे अवघड आहे. ती म्हणजे, सुरुवातीच्या काही दिवसात विनाउपचार महिला कर्करोगासह जगू शकतात. मात्र अशावेळी नियमित वैद्यकीय तपासणी गरजेची. ड्यूक विद्यापीठातील स्तन कर्करोगाच्या प्रमुख डॉ.शैली व्हांग एक अभ्यास सुरू करणार आहेत. या अभ्यासात डक्टल कार्सिनोमा कॅन्सरने पीडित शस्त्रक्रिया वा रेडिएशन करणाऱ्या महिला तसेच उपचार न करणाऱ्या महिलांची स्थिती तपासली जाईल. व्हांग म्हणतात, बहुतांश महिला आक्रमक उपचार पद्धती अवलंबतात. मात्र हा दुसरा पर्यायही त्यांना हवा असतो.

वेगाने पसरणाऱ्या कर्करोगावर थोडासा उपचारही खूप असतो. ट्यूमरच्या अतिआधुनिक जेनेटिक टेस्टिंगमुळे पुन्हा उसळणाऱ्या कर्करोगाचे संकेत देणारे जेनेटिक परिवर्तन जाणून घेता येतात. हेही जाणून घेता येते की, केमोथेरपी, हार्मोन्स आधारित औषधांचा ट्यूमरवर काय परिणाम होतो? पुढील पिढीच्या या तपासण्या वैयक्तिक उपचारासाठी डॉक्टरांना लाभदायी ठरतात.

उत्तम आहार, धोका कमी
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अनुसार 75% से 80% स्तन कर्करोगाचा संबंध जीवनशैली आणि पर्यावरणाशी आहे. फळे, भाज्यांच्या सेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका ६० टक्के कमी होतो. रोज एक तास व्यायामामुळे २५ ते ३० टक्के धोका कमी होतो.

लठ्ठपणा कळीचा...
अनेक प्रकारचे कर्करोग लठ्ठपणामुळे होतात. प्रमाणित आहार आणि व्यायामामु‌ळे लठ्ठपणा वाढत नाही. तज्ञांचा अंदाज आहे की, शरीरातील फॅट इतर अवयवाप्रमाणेच काम करते आणि स्तन कर्करोगाचा धोका वाढवणारे हार्मोन एस्ट्रोजनसह अनेक हार्मोन्स निर्माण करते.
बातम्या आणखी आहेत...