आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बदला’ अन् ‘मुकेश’ वर्कमुळे नव्याने खुलला नववधूचा शृंगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निकी यांच्या ब्रायडल कलेक्शनवर नवाब आणि बेगम हजरत महल यांचा प्रभाव दिसून आला. त्यांनी बदला वर्कवर पुन्हा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सोनेरी शीटच्या पातळ तारा तयार करून त्यापासून हे खास डिझाइन तयार केले. त्यांचे कलेक्शन ‘एकरू’-जन्म, ‘ज्वेल’-तारुण्य, ‘व्हर्मिलियन’-विवाह, ‘विंटेज’-वानप्रस्थाश्रम, ‘नॉयर’-मृत्यू यात विभागले होते. ब्लॉक प्रिंटिंगसाठी निकी प्रसिद्ध आहेत. त्या म्हणतात, ‘कोट्यूरमध्ये डिझायनर्ससाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होते.’ त्यांनी लहंग्यावर मुकेश वर्क व चोलीवर टायबॅक स्टाइल दिली आहे. कलेक्शनमध्ये व्हाइट, आयव्हरी आणि पेस्टल ब्लू शेड्स पाहावयास मिळाले.
अनारकली सूटमध्ये चारकोल ब्लॅकसोबत चमकदार बदला वर्क पाहायला मिळाले. त्या सांगतात, निर्भीड विचारसरणीमुळे राणी हजरत महल आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. हाच प्रभाव त्यांच्या कलेक्शनवरही पाहायला मिळतो. त्यांनी लहंग्यात मुकेश आणि चिकण वर्क वापरून त्याला पारंपरिक टच दिला आहे, तर डिझाइन आणि स्टाइल सध्याच्या युगातील आहेत. शो यशस्वी झाल्यानंतर त्यांना याच युनिक डिझाइनवर काम करण्याचे प्रोत्साहन मिळाले. त्यांनी झरोका, कार्व्हिंग टेबल आणि मिरर सेटलाही विंटेज लूक दिला. त्यांनी सादर केलेल्या 42 डिझाइन्समध्ये अवधमधील सौंदर्य दिसून आले. लाल रंगामुळे कलेक्शनला ब्रायडल लूक मिळाला. ‘एकरू’मध्ये व्हाइट आणि आयव्हरी कॉटन तसेच चंदेरी लाइटवेट नेटचाही वापर करण्यात आला. डॉट्स आणि फ्लोरल पॅटर्नसाठी बदला वायर वापरण्यात आले. पांढर्‍या रेशमासोबत सिल्व्हर वर्क आणि एम्ब्रॉयडरी वापरण्यात आली. ड्रामाटिक इफेक्ट देण्यासाठी लाँग चोघासारखे प्लीट ड्रेसही या कलेक्शनमध्ये दिसून आले.
ज्वेल लाइनमध्ये फ्लोरल मोटिफ, बदला वर्कची एम्ब्रॉयडरी आणि मेटल वायर वर्क पाहायला मिळाले. ब्रोकेड आणि नेटसोबत पर्ल, गोल्ड आणि डायमंडसोबत शिमर इफेक्ट देण्यात आला. लाँग अनारकली, फारसी पायजमा, स्ट्रेट लाइन कोट आणि प्लीटची साडी पाहायला मिळाली. व्हर्मिलियनमध्ये जर्दोजी वर्क बदला वर्कसह जोडून थ्रीडी इफेक्टचा लहंगा आणि अनारकली सूट दाखवण्यात आला. विंटेज लाइनवर इमाम बाडा यांचा प्रभाव दिसून आला. आरशांनी सजलेले मोतीवर्कचे सौंदर्यही खुलून दिसत होते.

छायाचित्र : राणी हजरत महल यांच्या आयुष्याचा प्रवास वधू पेहरावात सादर करण्यात आला