आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राइट कलर्सनी नखांना द्या अ‍ॅडव्हेंचर लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून म्हणजे ब्राइट कलर्सचा सीझन..! यंदा नेलपेंट्समध्येही अशा प्रकारचेच विविध रंग दिसून येत आहेत. तुम्ही हे रंग ट्राय केलेत का? प्रसिद्ध गायिका केटी पेरीप्रमाणे नखांवर ब्राइट रेड कलर लावा, असे मी तुम्हाला मुळीच म्हणणार नाही. पण काही वेगळे रंग ट्राय करण्याचा सल्ला मात्र मी तुम्हाला देईन. मरून, ब्लॅक किंवा व्हाइट रंगाला गुड बाय करा आणि सनशाइन यलो, हॉट पिंक आणि थ्रीडी कलर्सचे स्वागत करा.
या कलर्ससाठी तुम्ही केटी पेरी किंवा निकी मिनाकाला फॉलो करू शकता. रेड कोरल किंवा पेस्टल कलर्सची फॅशन सदाबहार आहे. असे असले तरी आता तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर बनण्याची गरज आहे. यासाठी मिल्की बेका, क्रीमी न्यूड किंवा सॉफ्ट लेट्टी कलर्स आपल्या नखांवर लावावेत. तुम्ही ब्लॅक शटरदेखील ट्राय करू शकता (घाबरू नका, यामुळे तुमचे नेल पॉलिश पुसले जाणार नाही. हा.. काही वेळानंतर नखांवर मात्र क्रेकलिंग इफेक्ट दिसून येईल. सर्वांना हा इफेक्ट आवडेलही.) किंवा मग काही दिवस प्रतीक्षा करा. फ्रेंच ओपनची प्रेरणा घेत टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने डिझाइन केलेले दोन नेल पेंट्स लवकरच बाजारात येत आहेत. जेल कलर्सचीही सध्या जोरदार चर्चा आहे. यांनाही तुम्ही ट्राय करू शकता. केवळ 30 सेकंदांमध्ये हा कलर वाळतो आणि तीन आठवड्यांपर्यंत याची चमक कायम राहाते.
तुम्हाला भडक रंग आवडत असतील तर मेबलीन सलून एक्स्पर्ट शॅम्पेन शिमरही तुम्ही ट्राय करू शकता. फॅशनेबल दिसण्यासाठी नेल पॉलिश व लिपस्टिकचा रंग कॉन्ट्रास्ट असू द्या. यलो रंगाच्या नेल पॉलिशवर शिमर किंवा आॅरेंज कलर आकर्षक दिसतो. नियॉन कलर्सचा ट्रेंड अद्यापही कायम आहे. तुम्हाला स्टार लूक हवा असेल तर नखांवर क्रिस्टल स्टोन किंवा बीड्सचा प्रयोगही तुम्ही करू शकता. यामुळे तुमची नखे आणखी सुंदर दिसतीलच, शिवाय अनेकांना तुम्ही तुमच्या नखांकडे आकर्षित करू शकाल. नखांवर अ‍ॅनिमल प्रिंट्ससाठी सॅली हॅनसेन सलून इफेक्ट्स नेल पॉलिश स्ट्रिप्स लावा. यासोबतच नखांवर पोलका डॉट्स, टायगर स्ट्रिप्सही ट्राय करू शकता.
फॅशन शोमध्ये सध्या कॉस्मेटिक कलर्सवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. फॅशनचे नवनवीन ट्रेंड्सही दिसून येत आहेत. डोना करनच्या शोमध्ये बर्गंडी कलर, शिनॅलच्या शोमध्ये रोका पिंक, ख्रिश्चियन डिओरच्या शोमध्ये चेरी रेड सोबत त्याच रंगाचे लिपस्टिक लावण्याचा ट्रेंड पडत आहे.
जॉकी स्ट्रिप्स, हाफ मून्स या जियोमेट्रिक चेकर्ड मेनिक्योरची आवड असणाºया महिलाही याला ट्राय करू शकतात. कपड्यांपासून नेल पॉलिशपर्यंत मिल्की ग्रीन कलरची फॅशन आहे. अशा अ‍ॅडव्हेंचर कलरचा वापर करत चांगल्या लूकसोबतच तुम्ही याचा आनंदही लुटू शकता.
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भडक रंग आणि नेल डिझाइन्स दिसून आले. सध्या नॅशनल व इंटरनॅशनल फॅशन वीक, फॅशन शो, मॉडल्स व अभिनेत्रींना चेकर्ड नेल डिझाइन आपल्याकडे आकर्षित करत आहे. नेल पॉलिशला हायलाइट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, मेकअप करताना लिप्स्टिकचा रंग विचारपूर्वक निवडा किंवा मग आठ बोटांना एक रंग आणि उर्वरित दोन बोटांना शिमर, प्रिंट, डिझाइन किंवा चेकमध्येही तुम्ही पेंट करू शकता. हॉलीवूड अभिनेत्री बेयोंसे, रिहाना, वेनेस्सा हजेन्स या आपल्या नखांवरही अशाच प्रकारचे डिझाइन करून बोल्ड आणि ब्यूटिफुल लूकमध्ये दिसतात.