आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत प्रभावीपणे मत मांडण्याचे काही उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेकदा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सहभागी होता. मात्र, मीटिंगमध्ये आपले म्हणणे प्रभावशाली पद्धतीने मांडण्यात यश येतेच असे नाही. अनेकदा तर बोलण्याची संधीच मिळत नाही. निराश होऊ नका. पुढच्या वेळी मीटिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यात सहभागी होणार्‍या व्यक्तींशी योग्य संवाद प्रस्थापित करा. यासाठीच्या काही टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...

मीटिंगमध्ये स्वत:ची कल्पना मांडताना स्पष्ट बोला
मीटिंगमध्ये स्वत:चे म्हणणे मांडताना काही बाबींकडे विशेष लक्ष द्या. त्या मीटिंगमध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तींशी पूर्वीच सुसंवाद स्थापित करा. त्यांना तुमच्या कल्पनांिवषयी सांगा. त्यांना मीटिंगची उद्दिष्ट्ये सांगा. त्यांना पूर्वकल्पना असेल, तर तुमचे म्हणणे मांडणे अधिक सोपे होईल. थेट बोलताना गोंधळून गेल्यासारखे होत असेल, तर तुमचे मुद्दे लिहून ठेवा. स्वत:ची कल्पना मांडताना आवाजात स्पष्टता व निश्चयी वृत्ती दिसणे गरजेचे असते. उत्स्फूर्ततेने म्हणणे मांडा.
(स्रोत : वुमन, फाइंड युअर व्हॉइस बाय झिल अँड मेरी डेव्हिस हॉल्ट)

धोरणात्मक नियोजन करताना पर्यायांचा विचार
स्ट्रॅटेजी तयार करताना कंपनीसमोर अनेक आव्हाने असतात. स्पर्धेला सामारे जाण्यासाठी प्रस्थापित कंपन्यांनी उपलब्ध पर्यायांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ स्ट्रॅटेजी काय असावी आणि त्यासाठी कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत, हे स्पष्ट असले पाहिजे. यात कोणाचा सहभाग असेल, उपलब्ध स्रोतांचे नियोजन काय असेल, यासंबंधी स्पष्टता असली पाहिजे. केलेले नियोजन अपयशी ठरले तर समस्यांवर लक्ष देण्याऐवजी योग्य पर्यायांचा विचार करा. अपेक्षित उत्पादन होत नसल्यास कोणता पर्याय निवडायचा हे स्पष्ट करून घ्या. प्रकल्प बंद करायचा की त्यात अजून गुंतवणूक करायची, याचाही विचार करून ठेवा. त्यामुळे समस्या लवकर सुटेल.
(स्रोत : प्लेइंग टू विन स्ट्रॅटेजी टूलकिट)

व्यवहारात बदल करण्यासाठी प्रतिसादाचा विचार
कोणी तुमचा सल्ला मागत आहे, तुम्ही सल्ला देण्यास टाळाटाळ केली, असे कधी झाले आहे का? कोणावर नाखुश आहात आणि त्या व्यक्तीला याची कल्पनाच नाही, असे झाले आहे का? अनेकदा स्वत:च्या आक्रमक स्वभावाचे आकलनच व्यक्तीला नसते. मात्र, याविषयी आत्मपरीक्षण केले नाही, तर तुमची विश्वासार्हता घटत जाते. तुमच्या नकारात्मतक व आक्रमक स्वभावाची कारणे प्रथम शोधून काढा. एकदा कारणे लक्षात आली की त्यावर मात करणे सोपे होते. स्वत:ला प्रामािणकपणे काही प्रश्न विचारा. तुम्हाला कोणते उद्दिष्ट गाठायचे आहे? तुमच्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करा. बदल घडवण्यासाठी इतरांचे प्रतिसाद गांभीर्याने घ्या.
(स्रोत : सायन्स यू आर बिन्स पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह बाय म्युरिल विलकिन्स)

मार्केट ट्रेंडनुसार स्वत:त बदल घडवा
मार्केट ट्रेंडमध्ये सातत्याने बदल होत असताना स्वत:ला अपडेटेड ठेवण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वत:च्या कौशल्यांचे विश्लेषण करा. कोणत्या कौशल्यांत तुम्हाल गती नाही, हे जाणून घ्या. कोणती कौशल्ये विकसित करण्यास वाव आहे, याचा विचार करा. वरिष्ठ, टीमचे सदस्य, मित्रांना याची विचारणा करा. तुमच्यासाठी आदर्शवत व्यक्तींकडून मार्गदर्शनही घेऊ शकता. नेहमीच्या कक्षेबाहेर जाऊन काम केल्यावरही नव्या कल्पना, मार्केट ट्रेंड व नव्या तंत्रज्ञानाचे आकलन करता येईल. (स्रोत : कीप लर्निंग वन्स यू हीट द सी- सूट बाय बोरिस ग्रायसबर्ग)

प्रत्येकापर्यंत आवश्यक सूचना पोहोचवा
कामाच्या विविध पद्धती अवलंबणे पुरेसे नसते. कामाशी स्वत:ला जोडून घेतल्यास टीमला खरे प्रोत्साहन मिळते. लोकांना खास वागणूक दिल्यानंतरच ते अधिक उत्साहाने काम करतात. त्यामुळे निर्णय क्षमतेतही वाढ होते. तुम्ही टीम लीडर, बॉस असाल तर या बाबी लक्षात घ्या. प्रत्यक्ष काम करणार्‍या लोकांना नेहमीच मीटिंगमधून डावलण्यात येते. मात्र, प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधा. कार्यालयात आवश्यक बदलांची काय गरज आहे, हे त्यांना अवश्य सांगा. त्यांनाही व्यावसायिक प्रशिक्षण, नेटवर्कच्या संपर्कात ठेवा.
(स्रोत : डायव्हर्सिटी इज युजलेस विदाऊट इनक्लुसिव्हिटी बाय क्रिस्टिन)