आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता वापरा, सुटीचा आनंद घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा ऑफिसमध्ये जबाबदार्‍या व काम वाढत जाते. मात्र, बॉसला याची जाणीव नसते. याविषयी बॉसशी मुद्देसूद चर्चा करा. सुटीवर जाण्यापूर्वी तंत्रज्ञानाचे योग्य व्यवस्थापन करा. त्यामुळे कामावर विपरीत परिणाम होणार नाही. तुम्हाला सुटीचा आनंदही घेता येईल. याविषयी टिप्स वाचा मधून...

जबाबदार्‍या वाढत असतील तर बॉसशी चर्चा करा
अनेकदा तुमच्या ध्यानीमनी नसताना बढती मिळते. त्यात जबाबदार्‍यांमध्येही वाढ होतेच. नव्या पदामुळे तुमचा फोकसही बदलतो. मात्र, नव्या जबाबदार्‍या तुम्हाला झेपत नसतील किंवा त्याचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नसेल तर ते तुमच्या आवाक्याबाहेरचे होऊ लागते. वेळोवेळी तुमच्या कामाचे आकलन करून घ्या. स्वत:ला विचारा, तुमच्या जबाबदारीत किती वाढ झाली आहे. याचे उत्तर होकारार्थी आले तर तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनपेक्षा हे काम किती वेगळे आहे, याचे मुद्दे काढा. तुम्हाला हा बदल जाणवत असेल, मात्र तुमच्या बॉसला याची जाणीव नसेल. त्यांच्याशी चर्चा करा. तुमच्या जबाबदार्‍या वाढत असतील तर त्याचा डेटा सूत्रबद्ध करून मांडा. त्यानंतर तुमच्या बॉसशी याविषयी चर्चा करा. नव्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी कोणते स्रोत तुम्हाला आवश्यक आहेत, याची जाणीव करून द्या. कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हेसुद्धा सांगा. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण सहयोग मिळू शकेल. (स्रोत: आर यू व्हिक्टिम ऑफ द इनव्हिजिबल प्रमोशन बाय रॉन)

विक्री वाढवण्याची लाभदायक पद्धत
अनेकदा आपण सेल्समनच्या बोलण्याने प्रभावित होऊन एखादी वस्तू खरेदी करतो. ग्राहक सेल्समनच्या कौशल्यावर खुश नसेल तर तो दुसर्‍या दुकानात निघून जातो.त्यामुळे तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचावे लागेल. त्यांना सांगा, ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. ग्राहकाचा कंपनीचे सीईओ व इतरांशी परिचय करून देण्याचा प्रयत्न करा. ग्राहकाच्या व्यवसायाविषयी त्याला विचारा. त्यांच्यासोबत भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न करा. ग्राहकांच्या शंकांचे समाधान करा. ग्राहकाला चुकीची माहिती देणे कटाक्षाने टाळा. कंपनीविषयी त्यांना माहिती द्या. कंपनीविषयी माहिती मिळाल्यास ग्राहकाशी विश्वासाचे नाते निर्माण होते. कंपनीची पार्श्वभूमी व ब्रँड इमेजविषयी ग्राहकांना उत्सुकता असते.
(स्रोत : टू विन द सेल, विन युवर कस्टमर्स हार्ट बाय क्लिफ रिचर्ड)

कर्मचार्‍यांना परस्पर सहकार्यास प्रोत्साहन द्या
कंपनीच्या प्रत्येक कर्मचार्‍याची क्षमता भिन्न असते.त्या क्षमतेचे निरीक्षण करा. क्षमतेनुसार त्यांचे आकलन असते. काही वेळा स्वत:वर फोकस करून लक्ष्यप्राप्ती करणे त्यांच्यासाठी अवघड असते. त्यांना याच आधारावर त्याचा मोबदला किंवा पुरस्कार मिळू शकतो. टीममधील काही सहकारी परस्परांना मदत करत नाहीत किंवा तसे करण्यास त्यांना भीती वाटते. त्यांचा फोकस स्वत:वर असतो. त्यामुळे टीमला वेळोवेळी त्यांच्या सामूहिक उद्दिष्टांविषयी सांगा. यासाठी टीममध्ये काही गट करा. जो गट चांगले काम करेल त्याला पुरस्कार द्या. जी माणसे समूहभावनेने काम करतात त्यांना बढती द्या. इतरांना सहकार्य भाव जोपासण्यास प्रोत्साहन द्या.
(स्रोत : गिव्ह युवर अनसंग ऑफिस हीरोज अ प्रेज बाय बेन वेबर)

सुटीवर जाण्यापूर्वी वेगळा ई-मेल तयार करा
सुट्यांवर जाण्यापूर्वी टीमला कामासंबंधी सर्व माहिती द्या. तंत्रज्ञान आणि गॅजेटचा वापर अधिकाधिक केल्यास सुट्यांमध्ये कामाचा ताण कमी करता येईल. तसेच कामावर विपरीत परिणामही होणार नाही. सुट्यांसाठी वेगळा ई-मेल तयार कार. हे अकाउंट केवळ सुट्यांमध्येच वापरा. ज्या लोकांशी संवाद साधण्याची इच्छा आहे, त्यांनाच हा ई-मेल द्या. या अकाउंटवर आपल्या सुट्यांची माहिती टाका. दुसरा मार्ग म्हणजे, स्मार्ट आउट-ऑफ-ऑफिस रिप्लाय सिस्टिम डेव्हलप करा. ई-मेलचे उत्तर उशिरा दिले तरी चालेल, अशी प्रणाली विकसित करा. किंवा आपल्या सहायकाशी संवाद साधण्यास सांगा. तिसरा- यात ई-मेल किती वेळा चेक करायचे आहे, याचे चेक-इन शेड्यूल तयार करा. ते रोज सकाळी किंवा मुले झोपल्यावर चेक करा; पण कामाच्या वेळी आपण कुठे असू, याविषयी टीमला माहिती द्या.
(सोर्स : द राइट वे टू अन प्लग व्हेन यू आर ऑन व्हॅकेशन्स )