आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योजना राबवताना बॉसच्या अनुभवांचाही वापर करा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाविषयी बोलताना परस्परांच्या नात्यावर परिणाम होऊ देऊ नका..
एखाद्या महत्त्वाच्या नात्यात फक्त आपला फायदा पाहणे कठीण असते. विशेषत: बॉस किंवा महत्त्वाच्या ग्राहकासोबत काम करत असाल तेव्हा.. पण प्रत्येक वेळी आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे ठरते. पुढील काही पद्धतींनी खुलेपणाने बोलता येईल. नाते आणि काम वेगळे ठेवा. नाते सर्वात महत्त्वाचे असते, मात्र ते कामापासून पूर्णपणे दूर असावे, याची काळजी घ्या. त्यामुळे ठरावीक नियम, अटी आणि मुद्दे ठळकपणे दिसतील. दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थितीचा फायदा घेऊ नका. माझा चांगला मित्र असशील तर हे नक्की ऐक, असे अजिबात म्हणू नका. चर्चेतून मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा. तिसरी बाब म्हणजे, साथीदाराच्या बाबतीत चांगला विचार करा. त्याचा आदर करा. प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहा. धीराने ऐका. एखाद्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विश्वास टाकल्यास नाते बळकट होतील. या गोष्टी लक्षात ठेवल्यास चर्चा करताना नात्यांवर फार परिणाम होणार नाही.
(स्रोत: ‘एचबीआर गाइड टू निगोशिएटिंग’, जॅफ)

तणावही काही सांगत असतो, त्याकडे बारकाईने लक्ष द्या
तणावामुळे आपल्या कामावर परिणाम होत असेल किंवा नात्यांवरही प्रभाव पडत असल्यास तणावावर बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. तणावाकडे भीती म्हणून पाहण्याऐवजी ते संकेत मानल्यास सकारात्मक बदल दिसेल. तणावाचे कारण काय? हा प्रश्न स्वत:लाच विचारा. एखाद्या सहकार्‍यामुळे तणाव निर्माण होत असल्यास नाते सुधारण्यासाठी त्याचा वापर करा. आपण इतरांशी कसे बोलतो, यावरही विचार करा. प्रमोशन किंवा नव्या जबाबदारीवर समाधानी असाल, तर याकडे अधिक लक्ष द्या. जुने काम सोडताना त्रास होतोय की नवी जबाबदारी स्वीकारण्याची चिंता आहे? नेतृत्व कौशल्य वाढवण्याची संधी ओळखा. कंफर्ट झोनमधून बाहेर पडा व नवी जबाबदारी स्वीकारा.
(स्रोत: ‘स्ट्रेस इझंट अ थ्रेट, इट्स अ सिग्नल टू चेंज’ डेव्हिड ब्रेनडेल)

कंपन्यांविषयी अधिक माहिती
आपले क्षेत्र चांगल्या पद्धतीने ओळखण्यासाठी नव्या कंपन्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नवी उत्पादने आणि स्पर्धकांची माहिती मिळेल. मात्र, नव्या कंपन्यांची सतत माहिती मिळवणे कठीण असते. कारण त्यांची माहिती सार्वजनिक स्वरूपात दिली जात नाही. अशा वेळी तीन गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. पहिली: या कंपन्यांचे गुंतवणूकदार कोण आहेत? काही गुंतवणूकदार फक्त अँगल इन्व्हेस्टिंग करत असतात. काही अर्ली-टू-मिड स्टेज कंपन्यांकडे लक्ष देतात आणि काही केवळ लेट-स्टेज स्टार असतात. एखादी कंपनी किती काळ टिकेल, हे गुंतवणूकदाराच्या प्रोफाइलवरून लक्षात येते. विदेशात त्यांची टीम आहे का? काही ठिकाणी आभासी टीम असल्यास कंपनीचा विस्तार, वेग इत्यादीविषयी माहिती मिळते. तिसरी बाब म्हणजे, लीडरशिप टीमची ताकद जाणा. या कंपन्यांमधील लीडर्सने कुठून शिक्षण घेतले, त्याची माहिती मिळवा. त्यांनी यापूर्वी कोणत्या कंपन्यांमध्ये काम केले आहे? या सीईओची पहिली पसंत काय आहे? टीममधील सदस्यांनी पूर्वीही एकत्र काम केले असल्यास त्यांची परिपक्वता कळून येते.
(स्रोत: ‘कीपिंग टॅब्स ऑन द काँपीटिशन अ‍ॅझ अ स्टार्टअप’, मायकल)

नव्या धोरणात बॉसचा फीडबॅक महत्त्वाचा ठरतो
कोणत्याही धोरणात वरिष्ठ व्यवस्थापकांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. मात्र बॉसकडे चकाचक कागदपत्रांवरील योजना नेण्यापेक्षा आपण आणि टीम सदस्यांनी केलेले काम दाखवावे. हे काम करण्यामागील उद्देशही त्यांना समजावून सांगा. त्यानंतर बॉसची कोणतीही प्रतिक्रिया ऐकण्याची तयारी ठेवा. तुम्हालाही बॉसच्या सल्ल्याची गरज असते. तुम्ही तुमच्याच कल्पनेत रमाल तर त्यांच्या कल्पनेकडे नीट लक्ष देऊ शकणार नाहीत. स्वत:चे काम सादर करण्याऐवजी सुदृढ चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करा. कंपनी लीडर्सकडे अफलातून संकल्पना असतात आणि महत्त्वपूर्ण योगदान देण्यावर त्यांचे लक्ष असते. त्यांचा सल्ला ऐकल्यास धोरणाला बळकटी मिळेल.
(स्रोत: ‘प्लेइंग टू विन स्ट्रॅटेर्जी टूलकिट’)

असे तयार करा ध्येयवेडे कर्मचारी
कंपनीत उत्कृष्ट कर्मचारी तयार करण्यासाठी विचारपूर्वक नेमणूक करावी लागेल. चांगल्या एचआरमधील टीमद्वारे कर्मचार्‍यांना प्रेरित, प्रभावित अणि मोठ्या पोस्टवर येण्यासाठी प्रोत्साहित करा. लीडर्ससाठी ते मार्गदर्शक ठरतात आणि कर्मचार्‍यांनाही विकासासाठी प्रोत्साहन देतात. यासाठी परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टिम तयार करावी. ज्या कंपन्यांमध्ये एंगेजमेंट लेव्हल जास्त असते, तेथे कर्मचार्‍यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. कामाचा वापर आपली ओळख तयार करण्यासाठी करावा. कंपनीच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास जास्तीत जास्त विकास होऊ शकेल.
(स्रोत: ‘7 थिंग्स ग्रेट एम्प्लॉइज डू’, पीटर)

(डेमो पिक)