आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bye Bye 2013 : England Royal Famaily Get Child Pleasureness

PHOTOS: निरोप 2013 ला:इंग्लंडच्या राजघराण्‍यास पुत्ररत्नचा आनंद, तर सचिनचे क्रिकेटमधून निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2013 आनंदाचे ठरले. ब्रिटिश राजघराणे नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदी होते, तर ख्रिश्चन समुदायात नव्या पोपचे स्वागतही जल्लोषात झाले. जगात पाऊल ठेवण्यापूर्वीच डॉक्टरांचा हात पकडणा-या तान्ह्या बाळाच्या छायाचित्राने सर्वांनाच भावुक केले. याच वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटचा निरोप घेतला. या वर्षाने आनंद, हास्य आणि भावुक होण्याचे अनेक क्षण दिले.
पहिला ‘शेक हँड’
अमेरिकेतील एका तान्हुलीने जन्मत:च डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का दिला. एरिझोना प्रांतातील एका रुग्णालयात रेंडी अ‍ॅटकिन्स हे पत्नीच्या सिझेरियन ऑपरेशनचे छायाचित्र घेत होते. प्रसूती सुरू असतानाच तान्ह्या मुलीने डॉक्टरांचा हात पकडला. या घटनेने डॉक्टरही चकित झाले. कारण ते बाळ अजून गर्भातच होते, त्याचा फक्त हात बाहेर आला होता.