आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bye-Bye 2013! देशाला बदल हवाय... तयारी ठेवावीच लागेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षीच्या प्रमुख घटना स्मरल्यानंतर या सर्व घटनांतून एकच स्पष्ट संदेश मिळतो. तो म्हणजे लोकांना बदल हवा आहे. आता कोणतेही ढोंग चालणार नाही. श्रद्धा असो वा राजकारण. दुराचरण करणारे लोक जनतेच्या नजरेतून उतरले. एवढेच नाही, तर त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. दुसरीकडे काही उजळ प्रतिमा पुढे आल्या. अनोळखी चेहरे आदर्श बनले.
दिल्लीकर जनतेने 15 वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून लोकशाहीत नवा इतिहास रचला. होत्याचे नव्हते करणारी उलाढाल फक्त राजकारणातच झाली असे नाही, तर क्रीडा, कॉर्पोरेट आणि प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनाही कु कृत्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागले. भारतासह जगभरात अनेक उदाहरणे समोर आली. नोकियाने स्वत:ला बदलले नाही. परिणामी, कंपनी विक्रीत निघाली. लक्षात ठेवा, तुमच्यावर सगळ्यांचे लक्ष आहे. लोकांना सगळे माहीत आहे... त्यांची दिशाभूल करण्याच्या भ्रमात राहू नका..
* नवीन नेतृत्व तयार करतो तोच लीडर
विविध क्षेत्रांत या वर्षी नेतृत्वावरून प्रश्न उपस्थित झाले
1. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्यास लालकृष्ण अडवाणी यांनी विरोध केला. परंतु त्यांच्यावर टीका झाली. मोदींचे मोठे समर्थन झाले होते. शेवटी अडवाणींना झुकावे लागले.
2. इन्फोसिसमधून निवृत्त नारायण मूर्ती पुन्हा परतले. मुलालाही घेऊन आले.
3. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले जात नाही. राज ठाकरे हे मोदींच्या निकटस्थ आहेत. आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आणखीनच रंगणार आहे.
4.आंध्रमध्येही अशीच स्थिती आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन काँग्रेससाठी नकोशे झाले आहेत. काँग्रेसने जेव्हा-जेव्हा तुरुंगात पाठवले, ते लोकप्रिय होत गेले.
बोध : खरा लीडर आपल्यासोबत एक संपूर्ण टीम तयार करतो, परंतु नवीन लीडर तयार करण्यावर मात्र तो भर देतो. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, कॉलनी, क्लब, संस्थेमध्ये आपला लीडर नवीन लोकांना नेतृत्वासाठी पुढे आणत नसेल तर त्यास लीडर मानू नका.