सी शिवाशंकरण : शिवाचे चेअरमन
चर्चेत का : एस-टेलची भागीदार असलेल्या बेटेलकोने 212 दशलक्ष न भरल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
जन्म : 29 जुलै 1956
कुटुंब : पत्नी जयालक्ष्मी (गृहिणी), मुलगा श्रवण शिवाशंकरन
शिक्षण : मेकॅनिकल इंजिनिअरिंग
शिवाशंकरन चांगल्या नफ्यात असूनही सोडलेले व्यवसाय
1997-98 1997-98 एअरसेलचा शुभारंभ. 1998 : देशातील पहिली डीएसएल इंटरनेट प्रोव्हायडर डिशनेटला समूहात सामील करून घेतले.
2003: 210 कोटी रुपयांत आरपीजी सेल्युलर कंपनीची 79 टक्के भागीदारी विकत घेत आश्चर्याचा झटका दिला.
2004: डिशनेटचे इंटरनेट युनिट व्हीएसएनएलला 270 कोटींत विकले. 2004 : बरिस्ताची 65.4 टक्के भागीदारी खरेदी केली.
2005 : 208 कोटी रुपयांत आरपीजी विकत घेऊन त्याचे ‘एअरसेल’ असे नामकरण केले. 2005 : 1.08 अब्जात एअरसेलची विक्री.
2007-08 कॉफी चेन ‘लवासा’ ला बरिस्ताची 480 कोटी रुपयांत विक्री. 2008 : नॉर्वेची ‘उगलँड’ शिपिंग कंपनी 1200 कोटी रुपयांत घेतली.
वडिलांच्या व्यवसायात फॅब्रिकेशन काँट्रॅक्टर म्हणून सुरुवात करणारे शिवाशंकरन हे सृजनशील कल्पनेने व्यवसाय उभारतात आणि त्याला विकासाच्या शिखरावर पोहोचवून सोडून देतात. 80 च्या दशकात देशात नव्यानेच संगणक आला होता. तेव्हा ब्रँडेड संगणकाची किंमत सर्वसामान्यांना न परवडणारी म्हणजेच 80 हजारांच्या घरात होती. शिवाशंकरन यांनी नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलला आणि 1984 मध्ये माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांचे वडील रॉबर्ट अमृतराज यांची ‘स्टरलिंग’ ही संगणक कंपनी विकत घेतली. या कंपनीत संगणक बनवून त्याला ‘शिवा पीसी’ असे नाव दिले आणि त्यांची ब्रँडेड कंपन्यांच्या संगणकांच्या अर्ध्यापेक्षाही कमी (33 हजार) किमतीत विक्री सुरू केली. अनेक प्रतिस्पर्धी आल्याने ही कंपनी बंद केली. शाही जीवनशैलीचे शौकीन असलेले शिवाशंकरन यांनी 80 दशलक्ष डॉलरपेक्षाही जास्त रक्कम मोजून तीन जेट विमाने खरेदी केली आहेत. संगापूरच्या रिट्ज कार्लटन हॉटेलचा प्रेसिडेन्शियल सूट त्यांच्या नावे वर्षभर बुक असतो. कॅलिफोर्नियाच्या फेरमाँटमध्ये एम.सी. हॅमर यांचे घर विकत घेऊन त्यांनी अमेरिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळवली.