आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता गर्भाशयातील मूल पाहा, एेका व अनुभवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअो दी जानेरिअो - गर्भात वाढणारे मूल पहिल्यांदाच पाहणे बहुतांश आई-वडिलांसाठी खूप रोमांचक अनुभव असतो. ही सोय आतापर्यंत केवळ उल्ट्रासाउंड इमेजमधून घेता येत होता. मात्र, आता पहिल्यांदाच व्हर्च्युअल रिअॅलिटी थ्रीडी स्कॅनिंग तंत्राद्वारे गर्भाशयात वाढणारे अपत्य पाहता,ऐकता येईल तसेच त्याचा अनुभवही येईल, ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी यात यश मिळवले आहे.

अल्ट्रासाउंड आणि एमआरआयमधून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारावर तंत्रज्ञान काम करते. यामध्ये एमआरआय व अल्ट्रासाउंड डाटाच्या मदतीने गर्भाचे थ्रीडी मॉडेल तयार केले जाते. याच्या साहाय्याने आई-वडील व्हर्च्युअल हेडफोनच्या माध्यमातून अर्भकाची स्पंदने ऐकू शकतील. तज्ज्ञांनुसार, यात केवळ गर्भाशयात वाढणाऱ्या अर्भकांचे छायाचित्र पाहता येईल असे नव्हे तर भ्रूणाला आजार असेल तर निदानही सहज होईल.डॉक्टर छायाचित्रात गर्भाच्या बाहेरच्या भागाशिवाय अंतर्गत पूर्ण रचना पाहू शकतील. म्हणजेच डॉक्टर गर्भात विकसित होणारे अवयवही पाहू शकतील. उपचारही सुरू करता येऊ शकेल. याशिवाय व्हर्च्युअल थ्रीडी प्रिंट अपत्यासाठी मॉडेलही होऊ शकते.

शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच अल्ट्रासाउंड व एमआरआय तंत्राचा एकत्र वापर केला. साधारणपणे अर्भकाचे स्पष्ट व चांगले छायाचित्र मिळत नसेल तर डॉक्टर मॅग्नेटिक रेझोनन्स (एमआरआय) वापरतात. या तंत्रज्ञानाचा उपयोग रिअो दी जानेरिअोतील एका क्लिनिकमध्ये होत असून लवकरच ते जगभरात उपलब्ध होणार आहे.

व्हर्च्युअल हेडफोनने स्पंदने एेकू शकाल
संशोधन टीममधील शास्त्रज्ञ डॉ. हेरोन वॉर्नर ज्युनियर म्हणाले, थ्रीडी इमेज आई-वडिलांसाठी निश्चितच वेगळा अनुभव देईल. ते अपत्याची वाढ पाहू शकतील. गर्भाच्या थ्रीडी छायाचित्रातून शारीरिक रचना समजण्यास मदत मिळेल. याचा शैक्षणिक कार्यातही उपयोग होईल. आतापर्यंत बनलेले मॉडेल जन्मानंतरच्या बाळांशी बऱ्याच प्रमाणात मिळतेजुळते आहे. या व्हर्च्युअल रियालिटी डिव्हाइसमध्ये शास्त्रज्ञांनी ऑक्सुलस रिफ्ट हेडसेटचा वापर केला. हे तंत्रज्ञान गर्भाचे स्पंदन अचूक पकडते. याचे वैशिष्ट्य म्हणजे आई-वडील गर्भातील बाळाची व्हर्च्युअल इमेज डोके फिरवूनही पाहू शकतील. डॉ. हेरोन म्हणाले, ऑक्युलस रिफ्टचा अनुभव आश्चर्यकारक असून अल्ट्रासाउंड व एमआरआयच्या छायाचित्रांपेक्षा गर्भाची प्रतिमा आणखी स्पष्ट दिसते.
बातम्या आणखी आहेत...