आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रक्ताच्या तपासणीतून लागेल अल्झायमर्स, कर्करोगाचा शोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सरसारख्या जटिल आजारांची माहिती करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या खर्चीक आणि त्रासदायक चाचण्या कराव्या लागतात. अनेक प्रकरणांत तर बायोप्सी किंवा मेंदूच्या स्क्रीनिंगनंतरही नेमकी काय गडबड आहे हे स्पष्ट होत नाही. परंतु केवळ रक्ताच्या काही थेंबांतून कॅन्सर, अल्झायमर्स आणि पार्किंसन्सच्या लक्षणांचा शोध लावता आला तर? अमेरिकेच्या अनेक संस्थांमध्ये शास्त्रज्ञ हार्मोन, गॅस, न्यूट्रिएंट, अँटिबॉडी हे रक्ताच्या इतर घटकांची चाचणी करून आयुष्य वाचवणारी महत्त्वाची माहिती संकलित करत आहेत. काही वर्षांतच ही माहिती लोकांना उपयोगी पडू शकेल.

आजाराची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेला गती देणे आणि ती स्वस्त करणे हे या संशोधनाचे मुख्य ध्येय आहे. अल्झायमर्स, ऑटिझम आणि नैराश्यसारख्या मेंदूविकारांना रक्ताच्या या तपासण्यांतून अधिक अचूकपणे ओळखले जाऊ शकेल. तूर्तास या आजारांवर निश्चित निदान नाही.

रक्ताच्या माध्यमातून आजारांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अनेक तपासण्यांनंतरच कसोटीवर खरी उतरू शकेल. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅनफ्रान्सिस्कोचे डॉ. ख्रिस्टिन याफे सांगतात, आम्ही लांबचा मार्ग निश्चित केला आहे.