Home »Divya Marathi Special» Career Information

PHOTOS : पुढे जाण्यासाठी कंपनी बदलत राहण्याची गरज नाही

दिव्य मराठी | Feb 10, 2013, 02:00 AM IST

करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कौशल्यात सुधारणा करणे, कामाच्या पद्धतीत बदल करणे आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी परिश्रम घ्या. पुढे जाण्यासाठी एकानंतर एक कंपनी बदलत राहण्याची गरज नाही. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने त्यासंबंधी दिलेली माहिती...
माहितीपूरक मुलाखतीतून मिळतील चांगले पर्याय
इन्फर्मेशनल इंटरव्ह्यूमध्ये करिअरचे चांगले पर्याय समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळते. एवढेच नाही तर करिअरशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी पूरक वातावरणही दिले जाते. त्यात काही धोकेही आहेत. पहिला - फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडले नाही तर तुमचे संबंध धोक्यात येऊ शकतात. आपले संबंध भक्कम करण्यासाठी सहकार्य मागण्यास मागेपुढे पाहू नका. दुसरा - तुम्ही नेमके कोणत्या दिशेने जात आहात, हे तुम्हाला नीट कळणार नाही. अशा वेळी तुमचा आत्मविश्वास दाखवा. असे केल्यामुळे अन्य लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवू लागतील आणि मदतीचा हात पुढे करतील. तिसरा- प्रश्नोत्तरे करण्यापूर्वी आपले स्थान निर्माण करा. तुम्हाला भलेही शंभर टक्के योग्य उत्तरे मिळणार नाहीत. परंतु तुम्हाला काय हवे आहे, याचा अंदाज येईल. तुमची एकापेक्षा जास्त करिअरमध्ये रुची असेल तर तेही स्पष्ट सांगून टाका.
(स्रोत : एचबीआर गाइड टू गेटिंग राइट जॉब)

Next Article

Recommended