आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारांचा पाठलाग करणार सॉफ्टवेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपराध्यांचा माग काढण्यासाठी अनेक कंपन्या नवीन प्रकारचे सॉफ्टवेअर बनवत आहेत. संशोधक आयडीसी गव्हर्नमेंट इनसाइट्सनुसार अमेरिकेत पोलिस आणि कायद्याचे पालन करणार्‍या एजन्सींनी २०१४मध्ये आयटीवर २२२ अब्ज रुपये खर्च केले. अपराध्यांच्या हालचालींवरून उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. आयबीएमचे वाॅटसन सुपरकॉम्प्युटर पोलिस अधिकार्‍यांचे प्रशिक्षण आणि तपासासाठी सरळ सेवा पुरवतात. एसएएस, ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्टने अपराध्यांशी संबंधित माहिती वाचण्यासाठी सहज वाचता येईल असे सॉफ्टवेअर बनवले आहे.

न्यूयॉर्क शहरात एक नवीन कंपनी मार्क-43 ने पोलिस रेकॉर्ड व्यवस्थित करण्याची चांगली सिस्टिम बनवली आहे. पूर्ण रेकॉर्डला क्लाउडमध्ये एका भागात ठेवले जाऊ शकते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट क्राउच यांचे म्हणणे आहे की, मोठ्या संख्येत अपराधी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मार्क-43ला मेसाच्युसेट्स पोलिस डिपार्टमेंटचे कंत्राट मिळाले आहे. तसे, गेल्या काही वर्षांत न्यूयॉर्कच्या ५५८ कोटी रुपयांच्या डिस्पॅच सिस्टिममध्ये अनेक गोंधळ निर्माण झाले होते. डलासच्या २५ कोटी रुपयांच्या सिस्टिममधील उणिवांमुळे २० कैदी लवकर सुटले होते.
बातम्या आणखी आहेत...