Home | Divya Marathi Special | chamanlal gupta loss in bjp

भाजपमधून झाले चमन गायब

दिव्य मराठी नेटवर्क (दिल्ली) | Update - Jun 04, 2011, 12:59 PM IST

चमनलाल गुप्ता यांचा भाजपसाठी सौदा झाला, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी गुप्ता यांची संरक्षण राज्यमंत्रिपदाची कारकीर्द आठवावी. तेव्हा त्यांनी केंद्रात पक्षाची अनेक प्रकरणे सोडवली होती.

  • chamanlal gupta loss in bjp

    चमनलाल गुप्ता यांचा भाजपसाठी सौदा झाला, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी गुप्ता यांची संरक्षण राज्यमंत्रिपदाची कारकीर्द आठवावी. तेव्हा त्यांनी केंद्रात पक्षाची अनेक प्रकरणे सोडवली होती. आता गुप्ता पक्षात नाहीत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या हालचालींवर प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. प्रोफेसर गुप्ता निष्ठावंत कार्यकत्र्यांशी चांगल्या प्रकारे संबंधित आहेत. त्यांनी जरी पक्ष सोडला तरी त्यांच्या कार्यकत्र्यांनी त्यांची साथ सोडली नाही. गडकरी यांच्या गटाने चमन यांना बाहेरचा रस्ता दाखवला; पण राज्यातील पक्षासाठी कोणतीही ब्ल्यूप्रिंट कोणाकडेही नाही. पक्षातून सहा वर्षांसाठी गुप्ता यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक मार्ग पुढील भविष्यासाठी खुले आहेत. मात्र, भाजपकडे गुप्ता यांच्या तोडीचा कोणताही राजकीय नेता सध्या नाही.

Trending