आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यात बदलाच्या इच्छेमुळे दु:ख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलतान चित्रपटात इरशाद कामिल यांनी एक सुंदर गाणे लिहिले अाहे. ‘जग घुमेया थारे जैसा न कोई’ संपूर्ण गीत हे अप्रितम अाहे; परंतु त्याच्यातील एक वाक्य मला चिंतन करायला लावते.  ‘जैसी तू है वैसी रहना’ हे प्रेमी अापल्या प्रेमिकाला सांगताे. हे वाक्य सर्व नात्यांमधील गुंफन हाेऊ शकते. नाते मग ते मैत्रीचे असाे, प्रेमी व प्रेमिकाचे असाे किंवा परिवारातील असाे त्यात दुरावा यामुळे येताे की जाे जसा जन्मला तसा त्याला काेणी स्वीकारत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याला बदलू इच्छिताे. मानवास घडवणे ही या जगात सर्वात कठीण कला अाहे. सर्व कलाकारांचे विषय निर्जीव असतात. प्रत्येक जण दुसऱ्याला बदलू इच्छिताे. संगीतकार सुरांची निर्मिती करताे. चित्रकार रंगांच्या माध्यमातून निर्मिती करताे. शिल्पकार धातूच्या माध्यमातून निर्मिती करताे.  त्यात  सृजन करण्यासाठी  निश्चितच प्रतिभा पाहिजे; परंतु काेणत्याही व्यक्तीची निर्मिती करणे सर्वात माेठी कलाकारी अाहे. दाेन व्यक्तींमध्ये हे संबंध सुंदर व प्रेमपूर्ण बनवण्यासाठी  संवेदनशीलता गरजेची असते.  व्यक्तींमध्ये संबंध यामुळे बिघडतात की, व्यक्ती एक-दुसऱ्याला अापल्या साेयीनुसार घडवू इच्छिताे. दुसरा जसा अाहे, तसा काेणाला अावडत नाही. एखादा प्रेमी अापल्या प्रेमिकास, मित्र अापल्या मित्रास, अाई-वडील अापल्या मुलास जर असे म्हटले, ‘तू जसा अाहे तसाच राहा,’ तर नात्यांमध्ये तणाव राहणार नाही. अाजच्या मेक ओव्हरच्या वातावरणात हे वाक्य क्रांती अाणू शकते.  आज प्रत्येक व्यक्तीस दुसऱ्या सारखे बनण्याची क्रेझ अाहे. त्याचे अनुकरण केले जाते. परंतु प्रत्येक व्यक्ती तसाच असताे जसे त्याला निसर्गाने बनवले अाहे. दुसऱ्यांसारखे बनवण्याचेे प्रयत्न दु:खाला निमंत्रण देण्यासारखे अाहे. जे काेणी असाधारण व्यक्ती झाले ते अापल्यासारखेच हाेते. त्यांच्यात एकच वेगळेपण हाेते. त्यामुळे ते नैसर्गिक गुण वाढवू शकले. त्यांनी कधी ही काेणाची काॅपी केली नाही.
- अमृत साधना, ओशो मेडिटेशन, रिसाॅर्ट, पुणे
 
बातम्या आणखी आहेत...