आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजावटीतून आपला मूडही बदला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


योग्य सजावटीने शरीरात ऊर्जा संचारते. खोलीच्या सजावटीत थोडाफार बदल करून मूड बदलणे शक्य आहे. ‘एक्सप्रेसिव्ह मॉडर्न’ या पुस्तकाच्या लेखिका व इंटेरिअर डेकोरेटर एमी लाउ यांनी मूड चांगला बनवण्यासाठी सजावटीत बदल कसा करावा ते सांगितले आहे. यातील कुठलीही पद्धत वापरून आपणही आपला मूड उत्तम राखू शकता.
* बेडरूमच्या भिंतींवर लाल, पिवळ्या, केशरी रंगांचा वापर करा. त्यातून सकारात्मक विचार येतील. आनंदाची जाणीव होईल. मुलांच्या खोलीत या रंगांचा वापर जास्त करा. त्याचा परिणाम मुलांच्या विचारांवर होईल.
*ज्या वस्तू महत्त्वाच्या वाटतात किंवा ज्यांच्यावर आपला जीव आहे त्या वस्तू आपल्या आसपास सजवा. उदाहरणार्थ फोटोफ्रेम, रंगीबेरंगी कुंड्या, मग, वॉल-हँगिंग वगैरे.
*भिंतींमध्ये नावीन्य आणा. झिगझॅग किंवा पोलका डॉट्ससारख्या पॅटर्नने त्या सजवा. त्यातून व्हिज्युअल एनर्जी आणि मोशन इफेक्ट मिळेल.
*रोजच्या वापरात असलेल्या कंटेनरचे स्प्रे-पेटिंगने आर्ट पीसमध्ये रूपांतर करा. कंटेनरवर एखादे आकर्षक डिझाइन काढल्यास छान वाटेल.
*बटाटे, कांदे, भेंड्या कापा. हे तुकडे रंगात बुडवून कॅनव्हास किंवा कागदावर विविध डिझाइन्स बनवा. ती मस्त दिसतील. सृजनशीलतेला बहर येईल. काही नवे करण्याच्या दिशेने आपण विचार कराल.
* टेक्श्चर मिक्स अँड मॅच करून वापरा. उदाहरणार्थ फजी पिलो सॉफ्ट थ्रोसोबत ठेवा. ही रचना डोके शांत ठेवील.