Home »Divya Marathi Special» Changes In Disney Magic Kingdom

डिस्ने मॅजिक किंगडमचा बदलणार चेहरामोहरा

मेगन फ्रीडमॅन | Jan 06, 2013, 03:56 AM IST

  • डिस्ने मॅजिक किंगडमचा बदलणार चेहरामोहरा

वॉल्ट डिस्ने वर्ल्डमध्ये एकसारखेच पोशाख परिधान केलेल्या दोन मुली किंचाळत आहेत. ‘अनचांटेड टेल्स विथ बेल्ले’ नावाच्या एका नाटकात बिस्टची भूमिका करण्याची त्यांच्यात स्पर्धा लागली आहे.
येथे उपस्थित प्रत्येक मुलाला ‘ब्यूटी अँड द बिस्ट’ शोमध्ये एक भूमिका देण्यात आली आहे, परंतु पाचवर्षीय एमिली आणि आठ वर्षांच्या अ‍ॅलेक्सिस अपारिसियोचे लक्ष केवळ बक्षिसांवर आहे. ती या शोमध्ये यापूर्वीही सहभागी झाली होती. तिला माहीत आहे की, जो सर्वात जोरात किंचाळेल त्याला बिस्टची भूमिका आणि बेल्लेसोबत नाचण्याची संधी मिळेल. अ‍ॅलेक्सिसने मन हेलावणारी किंचाळी ठोकत भूमिका आणि बक्षीस दोन्हीही पटकावले. छोटाशा जलपरीसोबत सीपीवर बसून फेरफटका मारण्याची दोन्ही बहिणींची योजना होती. हा सगळा अमेरिकेच्या लेक ब्यूएना, विस्टा, फ्लोरिडा येथील डिस्ने मॅजिक किंगडमचा हा भाग आहे. हे जगातील सर्वाधिक चालणारे थीम पार्क आहे. पार्कमधील बहुतांश खेळ रोमांचकारी रोलर कोस्टर राइडपेक्षा वेगळे आहेत. त्यात सहभागी आहेत असे स्टेशन्स, जिथे मुले आपल्या आवडीच्या पात्रांना भेटू शकतात. काही दिवसांपूर्वी मुलींचे सर्वाधिक लोकप्रिय पात्र प्रिन्सेसला भेटण्यासाठी भलीमोठी रांग दिसून आली.
वॉल्ट डिस्ने कंपनी थीम पार्कमध्ये नवीन आकर्षण जोडत आहे. कंपनीने 2.8 अब्ज डॉलरच्या खर्चातून मागील वर्षात आपले पार्क, रिसॉर्ट यांच्या सुशोभीकरणास सुरुवात केली आहे. डिस्ने मॅजिक किंगडमचा सर्वाधिक लोकप्रिय भाग फॅँटसीलॅँडचा विस्तार डिस्ने प्रिन्सेसला मिळालेल्या अमर्याद यशस्वितेला लक्षात घेत केला गेला आहे. कंपनीच्या स्नो व्हाइट, सिंड्रेलासह इतर महिला चरित्रांचे पोशाख व त्यांच्या नावावर इतर वस्तूंच्या विपणनाचे शानदार परिणाम दिसून आलेत.
डिस्ने प्रिन्सेस डॉल, पुस्तक, कॉस्ट्यूूम, स्नीकर्स, व्हिटॅमिन, अंथरुणासह चविष्ट व्यंजनांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढला आहे. 2000 मध्ये याचा वार्षिक व्यवसाय 30 कोटी डॉलर होता. आता हा जवळपास चार अब्ज डॉलरवर गेला आहे. प्रतिस्पर्धी पार्क आॅपरेटर युनिर्व्हसल स्टुडिओने 2010 मध्ये आॅरलॅँडोच्या जवळ आयलॅँड आॅफ अ‍ॅडव्हेंचरमध्ये हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेचा शुभारंभ करताना याच सूत्राचा अवलंब केला होता. पार्कमध्ये येणा-या लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली. दुसरीकडे, डिस्ने वर्ल्ड अपेक्षेप्रमाणे थंड होते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे डिस्ने वर्ल्डचा चेहरामोहरा बदलला जात आहे.
न्यू फॅँटसीलॅँडचे प्रिन्सेस फेयरिटेल हॉलमध्ये मुले आता आपल्या आवडीच्या पात्रांना भेटू शकतात. मॅजिक किंगडमचे उपाध्यक्ष फिल होम्स यांना आशा आहे की, यामुळे दर्शकांना भावनात्मक अनुभव येईल. तज्ज्ञ बार्टन क्रोकेट यांच्या मते, पार्कमध्ये नवीन वस्तू जोडल्या नाहीत तर लोक पार्कमध्ये येणे बंद करतील.
एकट्या फॅँटसीलॅँडच्या जोरावर पार्कचे पुनरुज्जीवन शक्य नाही. कंपनीच्या अधिका-यांना चिंता आहे की, मुलींवर केंद्रित प्रकल्पांकडे मुले आकर्षित होणार नाहीत. यामुळे भल्यामोठ्या सिंड्रेला सेक्शनच्या निर्मितीची योजना रद्द केली गेली. याऐवजी साहसावर आधारित रोलर कोस्टर बनवले जाईल. 2014 मध्ये हे सुरू होईल. न्यू फॅँटसीलॅँडचे रचनात्मक दिग्दर्शक ख्रिस बीएट्टी यांनी सांगितले की, प्रकल्पात पुरुषांच्याही आवडीनिवडीविषयी काळजी घेतली गेली आहे.

Next Article

Recommended