नव्या लोकांच्या टॅलेंटला कमी लेखणे योग्य नाही. नवे कर्मचारी कार्यालयातील वातावरणात फार रुळलेले नसल्याने सगळ्या लोकांशी सहजतेने संवाद साधू शकतात. त्यांना कंपनीसाठी काही नवीन करून दाखवण्याची इच्छा असते. नव्या कल्पनाही मिळू शकतील. यासंबंधी टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...
संदेश समजण्यासाठी उदाहरणे, किस्से सांगा
प्रेझेंटेशन देताना लक्ष्य गटाला विविध उदाहरणे व किस्से सांगितले तर संदेश अधिक काळ लक्षात राहतो. मात्र किस्से कसे ऐकवावेत? याच्या काही पद्धती आहेत. मी एक किस्सा सांगतो, जो माझ्या मनाला खूप भावणारा आहे, असे शब्द वापरू नका. प्रेझेंटेशन देतानाच सहजरीत्या किस्सा सांगा. त्यातला संदेश शेवटी सांगा. जास्त पाल्हाळीक किस्से सांगू नका. त्यामुळे ऐकणा-याचे लक्ष विचलित होते. संदेशाभिमुख थोडक्यात किस्सा ऐकवा. संभाषणातील एक विचार मांडताना एका व्यक्तीकडे फोकस करा. ४ते ७ सेकंद त्याच व्यक्तीकडे पाहून संभाषण करा.विविध व्यक्तींकडे फोकस करत राहा. योग्य ठिकाणी पॉज घेणे गरजेचे आहे.
(स्रोत : अ रिफ्रेशर ऑन स्टोरीटेलिंग बाय जेडी श्रम )
पुढे वाचा ऑफिसात रागावर नियंत्रण मिळवण्याचे कौशल्याविषयी...