आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये बदलाचे वारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरानमध्ये अयातुल्लाह रुहल्ला खोमेनी यांच्या बैठकीच्या खोलीच्या भिंतीवर एका मुलाचे चित्र लावले आहे. हे मोहंमद पैगंबर यांच्या किशोरवयीन अवस्थेतील पोर्ट्रेट आहे. आपण जाणतो की, इस्लाम धर्माच्या प्रवर्तकाला छायाचित्र किंवा इतर कोणत्याही रूपात प्रदर्शित करणे निषिद्ध आहे. मग आग ओकणा-या, फतवा जारी करणा-या आणि राजकीय इस्लामचे प्रतिनिधित्व करणा-या उग्र शियावादी नेत्याने इतक्या अपवित्र कामाला परवानगी कशी काय दिली? तेहरानमध्ये खोमेनी यांच्या घरात आणि म्युझियमच्या दारावर तैनात गार्डने खांदे उडवून सांगितले की, ‘मला माहीत नाही; मात्र हो, त्यांना हे चित्र आवडत होते.’


काही दिवसांनंतर खोमेनी यांच्या एका जुन्या मित्राला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. आम्ही इराणचे इस्लामी अध्ययन केंद्र असलेल्या कूम शहरात होतो. आम्ही खोमेनींच्या निवासस्थानी गेलो. तेथील मौलवी फराह झोला मुसावी यांनी सांगितले की, इस्लाममध्ये प्रतिकृतीच्या पूजेवर बंदी आहे, प्रतिकृतीवर नाही. जोपर्यंत लोक मोहंमद पैगंबर यांच्या चित्रासमोर नतमस्तक होत नाहीत, तोेपर्यंत एखाद्दुसरे चित्र लावण्यास हरकत नाही. इस्लामी कायद्याचे तज्ज्ञ मुसावी देशभरातून येणा-या प्रश्नांची उत्तरे देतात. ते म्हणतात, शियावादात लवचिकता आहे. खोमेनी व्यावहारिक होते. त्यांना ते पेंटिंग आवडायचे. त्यामुळे आम्ही ते त्यांच्या घरात ठेवले.


इराणी नागरिक व्यावहारिक आणि लवचिक आहेत, असे तुम्ही म्हणू शकता. त्यांनी कडक धार्मिक नियंत्रण आणि आपल्या कलात्मक परंपरा, आर्थिक निर्बंधांचे ओझे आणि व्यावहारिक इतिहास यांच्यात संतुलन ठेवले आहे. 14 जूनच्या राष्‍ट्रपतिपदाच्या निवडणुकीत टाइम मासिकाच्या प्रतिनिधींना येथे एक आठवडा राहण्याची परवानगी मिळाली. या निवडणुकीत कट्टरपंथी अहमदीनेझाद यांना मवाळ हसन रोहानी यांनी हरवले. आम्ही कूम, तेहरान येथे रेल्वेस्थानक, बाजारात, धार्मिक स्थळी जाऊन लोकांशी संवाद साधला. आपल्या अंदाजांना आव्हान देणारे देशाचे असे स्वरूप आमच्यासमोर उभे होते. राजधानीवर आर्थिक निर्बंधांचा परिणाम जाणवत नाही; मात्र तांदूळ व खाद्यतेलाच्या किमतीबाबत लोक असमाधानी आहेत. एक कोटी वीस लाख लोकसंख्येच्या तेहरानमध्ये हिरवळ तुमचे स्वागत करते. प्रत्येक रस्त्यावर झाडे लावलेली आहेत. आमच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाद्वारे नियुक्त भाषांतरकार होता.
मत मांडण्यासाठी आणि इतरांचे मत जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक होते. इंटरनेटवर बंदी लादलेल्या आणि सेन्सॉर केलेल्या बातम्यांमुळे त्यांचा बाह्य जगाशी संपर्क तुटलेला आहे. खिळखिळ्या अर्थव्यवस्थेमुळे चिंतेत असून निर्बंधांवर टीका करतात. जनतेला सरकार बदलण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूनेच हे निर्बंध लादले असल्याचे उदारमताच्या विरोधकांचे म्हणणे आहे. संगणक तंत्रज्ञ अली मुमताजचे म्हणणे आहे की, आम्ही एक क्रांती पाहिली आहे. त्यासाठी पुन्हा आमची तयारी नाही. उदारमतवादी व मवाळवादी लोकदेखील अणुकार्यक्रमाशी तडजोडीस तयार नाहीत. आम्ही आमच्या तंत्रज्ञानाचे काय करावे, हे सांगण्याचा अधिकार पाश्चात्य देशांना नाही, असे सांगून युवा उद्योजक एहसान शरीफ यांनी भारताजवळ अणुशक्ती आहे, तर आमच्याकडे का नसावी, असा प्रश्न उपस्थित करतात.
तेहरानचे वर्तमानपत्र काहयानचे संपादक हुसैन शरीयत मदारी यांना भेटलो. ते म्हणतात, अमेरिका आमच्याकडून इस्लाम ओरबाडून घेऊ पाहते. रोहनी प्राप्त स्थितीत बदल घडू शकतात का? हुसैन म्हणतात, बदल घडवू पाहणारे लोक व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच बदलाची अपेक्षा ठेवतात. उमेदवार, कार्यकर्ते आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनाई यांना मतदानाच्या बाजूने झालेल्या मतदान मोहिमेमुळे 75 टक्के मते मिळाली. 1997 मध्ये मवाळवादी मोहंमद खातेमी यांचा विजय झाला होता, तेव्हा एवढे मतदान झाले होते. इराणमधील बहुतांश मतदार सुधारणांच्या बाजूने आहेत, हे यातून सिद्ध होते. इकडे, अणूच्या मुद्द्यावर चर्चेसाठी रोहानींच्या धोरणामुळे पाश्चात्त्य देश आनंदी आहेत. तर, निर्बंध हटवणे आणि बाह्य जगाशी संबंध सुधारण्याच्या घोषणेने जनता समाधानी आहे. मात्र, राष्‍ट्रपती म्हणून त्यांना देशाच्या अणुधोरणाची दिशा बदलण्याचा अधिकार नाही. हे अधिकार सर्वोच्च नेत्याला आहेत.


खामनेई यांनी राष्‍ट्रपतिपदासाठी सुधारणावादी नेत्यास पुढे करणे हे इराणच्या आठ वर्षांच्या धोरणात बदलाचे हे संकेत आहेत. रोहानी खोमेनी समर्थक आहेत. इस्लामी क्रांतीपूर्वी दोघे विजनवासात होते. क्रांतीनंतर खोमेनी यांनी जे सरकार स्थापन केले, यात धार्मिक नेता लोकनियुक्त राष्‍ट्रपतींसोबत सत्तेत आजीवन भागीदार असतो. या व्यवस्थेनुसार रोहानी यांचा देशांतर्गत तसेच परराष्ट्र धोरणांवर अंकुश राहील.


आशा भंगल्या होत्या
2009 मध्ये इराणच्या युवकांनी अध्यक्षपदाचे उमेदवार मेरी हुसेन मुसावी आणि मेहदी करुबी यांचे समर्थन करीत सुधारणांची इच्छा व्यक्त केली. मात्र, मतदान संपण्यापूर्वीच अहमदीनेझाद साठ टक्के अधिक मतांनी विजयी घोषित झाले, तेव्हा लोकांचा लोकशाहीवरील विश्वासच उडाला. त्यामुळे युवक आणि महिलांचा राजकारणाबद्दल हिरमोड झाला. म्हणूनच या वेळी युवकांच्या पाठिंब्याने झालेल्या रोहानींच्या विजयाचे काहींना आश्चर्य वाटले. 2009च्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत.