आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील प्राचीन वृक्षांना डिजिटल आयडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये शेकडो वर्षे वय असलेल्या वृक्षांना डिजिटल आेळखपत्र देण्यात आले आहे. चीनच्या पूर्वेकडील शानडाँग प्रांतातील एका डोंगरावरील वृक्षांना अशी आेळख प्रदान करण्यात आली आहे.

झाडांचे डिजिटल आेळखपत्र तयार करण्यासाठी सरकारने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली सध्याचे वातावरण, नव्या पर्यावरणातील बदलांचा वेध घेईल. त्याचबरोबर त्याचे योग्य परीक्षण करून झाडांच्या संवर्धनासाठी मदत करण्याचे काम करेल. ही डिजिटल प्रणाली अत्यंत वेगाने आणि अचूकपणे काम करू शकते. झाडाचे संपूर्ण आरोग्य, त्याच्यातील कमकुवतपणा, त्याच्या मृत्यूची शक्यता अशा अनेक गोष्टींचा वेध घेण्यासाठी या प्रणालीद्वारे झाडांवर चोवीस तास देखरेख ठेवली जाते.
माउंट टाईवर प्राचीन वृक्षवल्ली आढळून आली आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासकांना ही चांगली पर्वणी ठरणार आहे. माउंट टाईवर ही वनसंपदा आहे. माउंट टाई हा चीनमधील पाच पवित्र डोंगरांपैकी मानला जातो. त्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. समुद्रसपाटीपासून तो १५०० मीटर उंचीवर आहे.
डिजिटल आय कार्डचे स्वरूप असे
झाडांची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे तसेच वातावरण, झाडास काही रोग असल्यास त्यावरील उपाय इत्यादी तपशील अशी बारीकसारीक माहिती त्यात नोंदवून ठेवण्यात आली आहे. त्याचा उपयोग झाडाच्या संवर्धनामध्ये केला जाऊ शकेल.
मोठी वनसंपदा
माउंट टाईच्या परिसराला निसर्गाचे प्राचीन काळापासून वरदान मिळाले आहे. त्यामुळेच हा प्रदेश घनदाट आहे. येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. माउंट टाईवर ५०० वर्षे वयोमान असलेला पाइन वृक्ष आहे. त्याची नोंद जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा यादीत करण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...