आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन-पाक मैत्री, सावधान इंडिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन पुन्हा हिंदी - चीनी - भाई भाईचा नारा देत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असले तरी या घोषणेआडून ते भारतीय सीमात घुसखोरी करण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या त्यांनी ही घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासून चीनच्या हातातील पाद्ये बनले आहे. ज्याचा वापर स्वत:चे हित जपण्यासाठी आणि भारताला कमकुवत करण्यासाठी केला आहे. म्हणून अलीकडे चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेले द्विपक्षीय करार भारताच्या दृष्टीने चांगला मानला जात नाही. या करारात पाकव्याप्त काश्मीरमध्ये 200 किमी लांबीचा रेल्वे बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही रेल्वे अरब राष्ट्रांना चीनशी जुडण्याचा महत्त्वाचा मार्ग राहिल. या दोन देशामधील वाढते संबंध भारतासाठी धोक्याचा इशारा आहे असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. भारताने वेळीच सतर्क झाले पाहिजे. चीन आणि पाकिस्तानमधील करार त्यावेळी झाला ज्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री ए.के. अँटनी चीन दौर्‍यावर होते. अशास्थिती चीनने पाकिस्तानसोबत करार करून भारतापेक्षा आपल्याला पाकिस्तान महत्त्वाचे असल्याचा स्पष्ट संकेत दिला. काश्मीर प्रश्नावर चीन सदैव पाकिस्तानची पाठराखण करत आहे.
भारतावर काय होतील परिणाम?
भारताच्या दृष्टीने पाहिले तर दोन्ही देशामध्ये झालेला रेल्वे करार हा बेकायदेशीर आहे.पाकने 1962 मधील चीन हल्ल्यानंतर 1963 मध्ये एका करारानुसार आपल्या ताब्यातील काश्मीरमधील शेकडो वर्ग किलोमीटरची जमीन चीनला सोपवली. भारताने हा करार कधीच अधिकृत मानला नाही. नव्या करारानुसार शतकापूर्वी वापरला गेलेल्या सिल्क रूट पुन्हा वापरात येणार आहे. नव्या रूटमुळे चीन पाकिस्तानमधील दळणवळण वाढणार नाही तर चीनला अरबी महासागरात दाखल होण्यास सुविधा उपलब्ध होणार असून हा चीनच्या आशिया धोरणाचे हे नवे शस्र असल्याचे संरक्षण तज्ज्ञांच मत आहे. त्याचप्रमाणे या रेल्वे कराराच्या मोबदल्यात शिनजियांग प्रांतातील उईगर मुस्लिमांचा विद्रोह थांबवण्यासाठी पाकिस्तान मदत करेल असे चीनला वाटते. पण रेल्वेच्या आगमनाने पाकिस्तानशी थेट दळणवळण वाढल्याने दहशतवादाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. या रेल्वेसोबत पाकिस्तानने चीनला ग्वादर बंदराचा विकास करण्याचे कंत्राट दिले आहे. हे बंदर चीनी नौदलाचा अड्डा बनणार आहे.तेथून चीन भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर नजर ठेवू शकतो . भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

उद्देश काय ?
लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये रीडर असलेले डॉ. हर्ष वी पंत अनेक वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन संबंधावर अभ्यास करत आहेत. त्याच्या मते दोन्ही देश भारताला कमकुवत करण्यासाठी एकमेकांना मदत करत आहेत. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य आहे की प्रशासकीय आणि लष्करी बाबतीत स्वत:च्या बळावर ते भारताला आव्हान देऊ शकत नाही. याच कारणासाठी पाक चीनसोबत संबंध वाढवत आहे, तर भारताची आशिया खंडात वाढती प्रतिमा आपल्यासाठी धोकादायक आहे ही चीनची भूमिका आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांना आपल्या जाळ्यात ओढणे हा चीनचा उद्देश आहे. याचाच भाग म्हणून चीन र्शीलंका, बांगला देश, म्यानमार, भूतान, नेपाळमध्ये सक्रिय झाला आहे. आता तर अफगाणिस्तान, इराणमध्ये सुद्धा हालचाल वाढवली आहे.

1. पाकिस्तानच का ?
पाकिस्तान हा चीनसाठी एक मोहरा आहे. जो भारताविरोधात वापरता येईल. पाकिस्तानला भारतासमोर एक आव्हान म्हणून उभे करून स्वत:ला आशियातील शक्तिशाली राष्ट्र होऊ इच्छितो, असे चीनला वाटते.

2. चीनला मिळाला भूभाग

1963 मध्ये चीन आणि पाकिस्तानमध्ये एक सीमा करार झाला आहे. भारताने याला अजून मान्यता दिलेली नाही. या करारानुसार पाकिस्तानने आपल्याकडील 1942 वर्ग किलोमीटरचा भूभाग चीनला हस्तांतरित केला आहे. यानंतरच चीन लद्दाख आणि उत्तर काश्मीरमधील शेकडो वर्ग किलोमीटर भूभागावर आपला दावा सांगत आहे.

3. आण्विक सहकार्य

पाकिस्तानला आण्विक शक्ती होण्यासाठी चीनने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे. चीनच्या मदतीला अणू कार्यक्रमाचे जनक अब्दुल कदीर खान यांनी याला दुजोरा दिला आहे. चीनने पाकिस्तानला 50 किलोग्रॅम युरेनियम समृद्ध अण्वस्र भेटवस्तू स्वरूपात दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. अण्वस्त्र प्रसारबंदी कराराशी संलग्न देश अशी मदत करू शकत नसताना चीन हे करत आहे. एवढेच नाही तर उत्तर कोरियाने देखील पाकिस्तानला अण्वस्रांची मदत केली आहे. चीनच्या इशार्‍यानेच हे काम झाले आहे.

दिवसेंदिवस दृढ होत आहे मैत्रीचे बंध
चीन आणि पाकिस्तानमधील संबंधांना 60 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. दिवसेंदिवस यांच्यातील संबंध वृंद्धिगत होत आहेत. चीन पाकिस्तानचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. एवढेच नव्हे तर तिसरा मोठा व्यापारी भागीदार आहे. 2008 मध्ये दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करार केला आहे.

1950 राजकीय करार
1966 लष्करी सहायता
1979 आर्थिक संबंध
1972 संरक्षण करार

300 मेगावॅटचे अणुशक्ती संयंत्र पंजाब प्रांतात उभारण्यासाठी चीनची पाकला मदत.

12 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीचा चीन-पाकिस्तानमधील व्यापार.

30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेचे करार दोन्ही देशांमध्ये 2010 मध्ये झाले आहेत.

10 कोटी डॉलरची गुंतवणूक चीनने लाहोरमधील गृहप्रकल्पामध्ये केली आहे.

हा लेख आंतरराष्ट्रीय प्रकरणाचे तज्ज्ञ वेद प्रताप वैदिक यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे.