आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळात मुलांना मूर्तींच्या भेटवस्तू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाताळच्या निमित्ताने लॅटिन अमेरिकेत मुलांना भेटवस्तू देण्याची प्राचीन परंपरा आहे. कोलंबिया, कोस्टा रिका, बोलिव्हिया, मॅक्सिको, पेरू इत्यादी देशही नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येथील दुकानांवर मुख्यत: तीन प्रकारच्या भेटवस्तू आहेत. यात बालरूपातील येशू आणि विविध रंगांचे सांताक्लॉज आहेत. येशू ख्रिस्तांच्या मूर्तीतही वैविध्य आहे. काही ठिकाणी स्पॅनिश परंपरेचे पालन केले जाते. यात तीन विद्वान पुरुषांच्या मूर्ती दिसतात. त्याला ‘लॉस रेगिस मागोस’ असे म्हटले जाते.

जर्मन विद्वान क्राइस्ट चाइल्ड म्हणजेच बालरूपातील येशूला महत्त्व देतात. तेथे कॅथलिक समुदाय ‘क्रिसमस मॅन’ (सेंट निकोलस) यांना मानतात, तर उत्तर स्पेनमधील बस्क भागात ओलेन्सेरो कॅरेक्टरला स्थानिक संस्कृतीत अधिक महत्त्व दिले जाते.

बालरूपातील येशू - कोलंबिया, कोस्टारिका आणि बोलिव्हियामध्ये बालरूपातील येशूची मूर्ती भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. त्याला ‘निन्ये जीझस’ असे म्हणतात. तेथे देशभक्ती दर्शवणाऱ्या मूर्तींची सध्या चर्चा आहे. मेक्सिको आणि पेरू या देशात सांता क्लॉजची मूर्ती भेट देतात. तेथे त्याला ‘पपा नोएल’ असे म्हणतात. }bizdailies.com
बातम्या आणखी आहेत...