आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंग मॉलमध्ये चर्च, खरेदीसोबत प्रार्थनेचाही आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील क्रास्नोयार्स्क शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये चर्च बांधण्यात आले आहे. ग्राहक येथे आल्यावर ते खरेदीसोबत प्रार्थनाही करू शकतील, या कल्पनेतून ही व्यवस्था केली असल्याचे मालकाने सांगितले आहे.

मॉलमध्ये चर्च बांधण्याची कल्पना कशी सुचली? याविषयी मालक म्हणतात, व्यवस्थापनातील एक अधिकारी एका धर्मगुरूकडे गेले होते. तेथे त्यांनी धर्मगुरूंना सुरक्षा रक्षक आणि ग्राहकांची वर्तणूक शिस्तीची राहील, असा काही उपाय सुचवण्याचे सांगितले. यावर धर्मगुरूंनी त्यांना मॉलमधील एका हॉलमध्ये चर्चची व्यवस्था करण्यास सांगितले. लोक तेथे आल्यावर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी निश्चितच थांबतील. येथील सुरक्षा रक्षक संस्थेचे व्यवस्थापक व्लादिमिर स्वोर्तसोव म्हणतात, या परिसरात एकही चर्च नव्हते. त्यामुळे मला व माझ्या टीमला चांगले काम व शांततेसाठी एका प्रार्थनास्थळाची आवश्यकता होती. आता या चर्चमुळे आम्ही अधिक चांगली सेवा देऊ शकणार आहोत. }varlamov.ru

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...