आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले दैनिक कोरियातून प्रकाशित झाल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील पहिले दैनिक कधी व कुठे सुरू झाले यावर मतभेद आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका दाव्यानुसार कोरियात १५५७ या वर्षी ‘जोबो’ (सकाळच्या बातम्या) पहिले दैनिक प्रकाशित करण्यात आले. तेथील योंगचियोंग शहरातील मठात राहणाऱ्या ५२ वर्षीय जिबाँग या भिक्खूंनी हा दावा केला आहे. पुराव्यासाठी त्यांनी या वर्तमानपत्राचे छायाचित्रही जारी केले आहे. 
भिक्खूंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे जोबो वृत्तपत्राच्या पाच प्रती आहेत. ६, १५, १९, २३ आणि २४ नोव्हेंबर १५५७ या तारखांची ही वृत्तपत्रे आहेत. यात जोसियन घराण्यातील क्रूर शासनाच्या कथाही आहेत.  त्यांना कोरियन भाषेत सिलोक म्हटले जाते. तत्कालीन राजा सिओंजो याला आपल्या महालातील बातम्या बाहेर प्रकाशित होत असल्याचे कळताच त्याने हे दैनिक बंद करवले. त्यानंतर दैनिकासाठी काम करणाऱ्या ३० जणांना शिक्षाही सुनावली. जोबो वृत्तपत्रात हवामान, घटना तसेच राजमहालातील नव्या नियुक्त्यांची माहिती प्रकाशित केली जात होती. जिबाँग या भिक्खूंनी ऐतिहासिक वस्तू विकणाऱ्या एका वेबसाइटवरून हे वर्तमानपत्र खरेदी केले असून वेबसाइटला हे कुणी विकले, याचा शोध अद्याप लागलेला नाही.  
-koreatimes.co.kr
 

अन्य दावे 
- जर्मन प्रकाशक जोहान कार्लोस यांनी १६०५ मध्ये ‘रिलेशन’नावाचे एक साप्ताहिक प्रकाशित केले होते. २००५ मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सने पुराव्यांच्या आधारे ते पहिले दैनिक असल्याचे घोषित केले होते. 
-जर्मनीतही ‘आइनकोमेंदे साइथुमॅन’नावाचे पहिले दैनिक १६६० मध्ये प्रकाशित झाल्याची नोंद आहे. 
- इसवी पूर्व ५९ मध्ये ‘अक्ता दिउरना’ हे दैनिक प्रकाशित झाल्याचा दावा आहे. 
बातम्या आणखी आहेत...