आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Closed To Gandhi's But Was Arrested In Their Power

गांधी कुटुंबाचे जवळचे असूनही त्यांच्याच राज्यात यांना झाली होती अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्ही. कृष्णमूर्ती, टेक्नोक्रॅट
वय: ९० वर्षे
कुटुंब: पत्नीचे निधन, दोन मुले विदेशात स्थायिक.
त्यांच्या "अॅट द हेल्म : मेमोयर' आत्मचरित्रातून अनेक रंजक गोष्टी समोर आल्याने ते सध्या चर्चेत आहेत.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यूपीए सरकार स्थापल्यानंतर सोनिया गांधी राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या प्रमुख झाल्या. त्या वेळी त्यांनी सर्वात आधी आपल्या सहकाऱ्यांमध्ये व्ही. कृष्णमूर्ती यांची आठवण काढली. याचे कारण म्हणजे राजीव सरकार पडल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांत कृष्णमूर्ती यांचे स्थान महत्त्वपूर्ण होते.

नरसिंह राव सरकार स्थापन झाल्यानंतर १९९२ मध्ये हर्षद मेहता घोटाळा झाला. हर्षदच्या कागदपत्रात केजे इन्व्हेस्टमेंट कंपनीला त्याने ३२.७४ लाख रुपये कर्ज दिल्याचे उघड झाले. ही केजे म्हणजे जयकर यांची कंपनी होती. कृष्णमूर्ती यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलांच्या नावाने ती हाेती. त्यांची नावे एन. जयकर आणि के.चंद्रा अशी आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार ही लाच होती. कृष्णमूर्ती यांना यासाठी राजधानीमध्ये ५३ दिवसांसाठी एका फ्लॅटमध्ये अटक करण्यात आली होती. २० महिन्यांनंतर सीबीआयने अमेरिकेमध्ये तपास संस्थेला या संदर्भात माहिती मागितली. मात्र, त्यात काही सापडले नाही व त्यांचा घोटाळ्यात सहभाग दिसला नाही.

कृष्णमूर्ती यांचा जन्म तंजावरच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी इंजिनिअरिंगचा एक छोटा कोर्स केला व १९४५ मध्ये मद्रास इलेक्ट्रिसिटी बोर्डात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. १९५४ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रीय इंजिनिअरिंग सेवेत दाखल झाले. यादरम्यान त्यांची नियोजन आयोगात रिसर्च ऑफिसर म्हणून निवड झाली. १९६० मध्ये त्यांना भेलचे प्रमुख करण्यात आले. सफारीचा वापर करणारे ते पहिले टेक्नोक्रॅट होते. १९६९-७० मध्ये त्यांना मलेशियाला जायचे होते. कॅनॉट प्लेसच्या एका टेलरने त्यांना सफारी सूटची डिझाइन दाखवली. सफारी घातल्यानंतर कार्यालयासाठी पूर्ण सूट घालण्याची आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे त्यांना हा पेहराव आवडला. ते बहुतांश वेळा पांढरा सफारी घालत असत. अन्य कोणत्या रंगातील पोशाखाशी स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी हा रंग निवडला होता.
जनता सरकार सत्ताच्युत झाल्यानंतर ते इंदिरा गांधींसोबत काम करू लागले. इंदिराजींच्या निकटच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची वर्णी लागली. त्यामुळे त्यांना मारुती उद्योगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले व डीलरशिप वाटपाचे काम सोपवले.

संजय गांधी यांच्यानंतर मारुतीचे सर्व काम इंदिरा गांधी यांच्या निगराणीखाली होत होते. कंपनीकडून पहिल्यांदा पीपल कार, सेडॉन कार सादर केली जाणार होती. मात्र, कृष्णमूर्ती यांनी आपल्या टीमच्या मदतीने बाजारपेठेत सर्वेक्षण केले तेव्हा छोट्या कारसाठी दबाव असल्याचे दिसले. छोट्या कारसाठी सुझुकी तयार नव्हती. निसान आणि मित्सुबिसी प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देऊ शकते हे लक्षात आल्यानंतर छोट्या कारवर सहमती होऊ शकली आणि मारुती-८०० आकारास आली.