आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपड्यातील सेन्सर सांगतील खेळाडूंचा फिटनेस, कॅनडाच्या विद्यापीठातील संशोधकांनी सेन्सर लागलेले कपडे तयार केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - खेळाडूंना वर्कआऊट करताना पर्सनल ट्रेनिंग देऊ शकतील असे कपडे आता बाजारात येणार आहेत. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ वाॅटरलूच्या दोन विद्यार्थ्यांनी सेन्सर लागलेले कपडे तयार केले आहेत. आता हायटेक कपडे बनवणारी कॅनडाची अॅथोस कंपनी या विद्यार्थ्यांसह मिळून असे कपडे बनवणार आहे. हे कपडे प्रोफेशनल खेळाडूंसाठी वर्कआऊट करताना मदतगार ठरतील, अशी आशा कंपनीला आहे.
धनंजा जयलाथ आणि क्रिस्टाेफर विबे यांना वर्कआऊट करताना असे कपडे बनवण्याची कल्पना सुचली. ते व्यायाम करत होते. त्यांना वाटले की एखाद्याला पर्सनल ट्रेनर ठेवायचा नसेल आणि त्याला योग्य रीतीने व्यायाम करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय असले पाहिजेत. त्यांनी आधी स्वत:साठी असे डिजिटल फिटनेस कोच बनवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी वर्कआऊट करताना गरज असलेले कपडे तयार करण्याची सुरुवात केली. या हायटेक कपड्यांत त्यांनी सेन्सर फिट केले. हे सेन्सर ब्ल्यूटूथच्या माध्यमाने मोबाइलशी कनेक्ट असतात. मोबाइलमध्ये याच्याशी संबंधित अॅप असते. ब्ल्यूटूथच्या मदतीने सेन्सर मोबाइलमध्ये डाटा ट्रान्सफर करतो. वर्कआऊट करताना स्नायू कसे काम करत आहेत, हे कपड्यात लागलेले सेन्सर सांगतात. हृदयाच्या ठोक्यांची गती किती आहे? शरीराला त्या वेळी कशाची गरज आहे? हे तेव्हासुद्धा खूप गरजेचे आहे, जेव्हा खेळाडू मैदानावर खेळत असेल. त्या वेळी खेळाडूच्या कपड्यात लागलेल्या सेन्सरच्या मदतीने ट्रेनर मैदानाबाहेर बसून आपला खेळाडू किती फिट आहे, हे तपासू शकतो. खेळाडूच्या आतील दुखापतीबाबतही यात माहिती मिळू शकते. या सर्वांच्या मदतीने ट्रेनर खेळाडूकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून घेऊ शकतो. हे आतापर्यंत शक्य नव्हते.

कंपनीचे सीईओ डॉन फॉल म्हणाले, ‘वर्कआऊट किंवा ट्रेनिंग करताना खेळाडूला काय माहिती हवी असते, हे आम्हाला माहिती नाही. हेच मोठे आव्हान आहे. प्रत्येक खेळाडूची जिज्ञासा वेगवेगळी असते. मात्र, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही सुरुवातीला शाळेच्या खेळाडूंसाठी असे कपडे तयार करणार आहोत. यानंतर चॅम्पियन आणि प्रोफेशनल खेळाडूंवर लक्ष केंद्रित करू.’
बातम्या आणखी आहेत...