आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clothing Style: Special Collection For Aids Patients

वस्त्रशैली: एड्स रुग्णांसाठी खास कलेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र - पुरुषांसाठी खास फॉर्मल ड्रेस
अहमदाबाद येथील ३ डिझायनर- विक्रांत, वायरल व आशिष यांनी त्यांचे डिझायनिंग लेबल ‘व्हर्च्यूज’च्या माध्यमातून एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांसाठी निधी उभारला आहे. आपल्या स्प्रिंग समर -१५ कलेक्शनला त्यांनी यासाठी समर्पित केले. बँकॉक येथील त्यांच्या एका मित्राला एड्स झाल्यानंतर या रुग्णांसाठी ठोस काही करण्याचे आपण ठरविले असे विक्रांतने सांगितले. या कलेक्शनमध्ये लाल व पांढरी रंगसंगती वापरली आहे.

शोच्या सुरुवातील एड्सविषयक २ मिनिटांचा माहितीपट दाखवण्यात आला. अनेक लोक या आजारापासून अनभिज्ञच आहेत, असे वायरलने सांगितले. शोच्या सुरुवातीला या आजाराविषयक फिल्म दाखवण्यात आली. या फिल्मचे सर्व अधिकार नाज फाउंडेशनकडे देण्यात आले आहेत. संस्थेच्या संकेतस्थळावर ही फिल्म उपलब्ध करून देण्यात आली आहे. शोमधून मिळालेल्या उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम नाज फाउंडेशनला देण्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस आहे. या निमित्ताने गरजूंपर्यंत हा निधी पोहोचवला जाईल.
या कलेक्शनमधील वस्त्रांवर जपानी कशिदाकारी शशिको पाहण्यास मिळते. ही जपानमधील प्राचीन कशिदाकारी आहे. शिवाय मधुबनी आर्टवर्कचाही यात वापर करण्यात आल्याचे विक्रांत यांनी सांगितले. याला प्रिंट्समध्ये घेतले असून त्यावर जपानी कशिदा आहे. यामुळे प्रत्येक ड्रेसवर लेअरिंगचा फील आलाय. जपानमध्ये याचा वापर डेनिमवर सर्वाधिक केला जातो. या कलेक्शनमध्ये टस्सर, चंदेरीवर याचा वापर केल्याने कपड्यांमध्ये दोन कल्चरचा संगम पाहण्यास मिळतो. महिलांना आरामदायक कपड्यांपेक्षा फॅशनेबल कपडे जास्त आवडतात, असे या डिझायनर्सचे म्हणणे आहे.
पुढे पाहा...