आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्याची शालीन वागणूक पाहून आयएएस होण्याचा निश्चय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन. प्रशांत, आएएस
वय- ३५ वर्षे
शिक्षण - बीए, एलएलएम, शासकीय विधी महाविद्यालय, तिरुवनंतपुरम
कुटुंब- पत्नी लक्ष्मी
चर्चेत का -कार्यालयात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जागा दिली.

२ लाख फेसबुक फॉलोअर्स असणारे ते देशातील एकमेव जिल्हाधिकारी आहेत. त्यांची लोकप्रियता प्रचंड असून लोक त्यांना ‘कलेक्टर ब्रदर’ म्हणून हाक मारतात. आयएएस अधिकारी होण्याचा निश्चय त्यांनी लहानपणीच केला होता. एका घटनेमुळे ते या पदासाठी प्रेरित झाले. त्यांची आई वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करत असत. तेथील प्राचार्य आणि डॉक्टरला कार्यालयीन कामासाठी आरोग्य सचिवांची भेट घ्यायची होती. तेव्हा प्रशांत ७ वर्षांचे होते. आरोग्य सचिवांच्या कार्यालयात ते गेले तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते. सचिवांनी त्यांची आई व इतरांशी चर्चा केली. सचिवांनी शांतपणे सर्व म्हणणे एेकले. सचिवांनी ज्या अदबीने त्यांच्या आईशी संवाद साधला त्यामुळे प्रशांत प्रभावित झाले.

सचिवाच्या नेमप्लेटवर प्रशांतचे लक्ष गेले. त्यावर आयएएस लिहिले होते. तेव्हापासून आयएएस बनण्याचा निश्चयच केला. पाण्याचे कुंड साफ करण्यासाठी त्यांनी लोकसहभाग घेतला. या उपक्रमाचे फेसबुकवरून देशभरात कौतुक झाले. नुकतीच कोर्टाच्या आदेशामुळे गरीब मुलांची एक शाळा बंद पडली. येथे ७५ विद्यार्थी होते. त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून प्रशांत यांनी आपल्या कार्यालयात त्यांच्या शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून दिली.

प्रशांत आणि पत्नी लक्ष्मी मल्याळम दिग्दर्शक राधाकृष्णन मेनन यांच्यासाठी विनोदी चित्रपटाची पटकथा लिहीत आहेत. केरळमध्ये गेल्या निवडणुकांच्या वेळी काही लोक अवैध वाळू उपसा करत होते. प्रशांतला पदावरून हटवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तत्कालीन काँग्रेस सरकारकडे यासाठी शिफारसही केली. मात्र, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याला हटवण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला होता.
बातम्या आणखी आहेत...